राज्यात सत्तांतर झाले तरी आम्ही मोर्चा काढणार, नरेंद्र पाटलांचे सूचक विधान |

 

सोलापूर | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्दचा निर्णय व केंद्राने राज्यांना अधिकार असल्याचे म्हणणारी दाखल केलेली याचिका फेटाळल्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. यावर माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी मराठा आक्रोश मोर्चाच्या पत्रकार परिषदेत मोठे विधान केले आहे.

येत्या काही महिन्यांत राज्यात सत्तांतर झाले तरी आम्ही मोर्चा काढणार आहोत. सोलापुरात ४ जुलै रोजी मराठा क्रांती आक्रोश मोर्चा निघणार आहे. शरद पवारांचा काळ, काँग्रेस-राष्ट्रवादीचा आघाडीचा काळ पाहिला तर त्यांचा द ग्रेट मराठा असा उल्लेख होतो.

मात्र आज शरद पवारांनी मराठ्यांच्या बाजूने कोणतीही भूमिका घेतलेली नाही. यामुळे पवारांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी. आरक्षण रद्द झाल्यानंतर शरद पवारांनी काहीही भूमिका घेतली नाही, असा आरोप पाटील यांनी केला होता.

काय म्हणाले होते संभाजीराजे | आम्ही राज्यभरात दौरा करणार आहोत. १०२ व्या घटनादुरुस्तीत राज्याचे अधिकार अबाधित आहेत, अशी याचिका केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ती फेटाळली आहे. याचा अर्थ असा होतो, की राज्याला अधिकार राहिलेले नाहीत. यामुळे रिव्ह्यू पिटीशन टाकणे उपयोगाचे नाही, असे संभाजीराजे म्हणाले.

Team Global News Marathi: