“पवारांबद्दल खालच्या पातळीवर बोला त्याशिवाय प्रसिद्धी मिळणार नाही” आव्हाडांनी पडळकरांचे टोचले कान |

 

मुंबई | भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीची टीका केली होती. या टीकेचे पडसाद आता दोन्ही बाजूला दिसू लागले होते. त्यातच आता पडळकरांनी केलेल्या टीकेचा राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, महाराष्ट्राच्या राजकारणात हे सर्वश्रूत आहे की, जोपर्यंत शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर आपण टीका करत नाही. तोपर्यंत मीडिया आपली दखल घेणार नाही. आपल्याला बातमीत राहायचे असेल तर बाकी काही बोलले नाही तरी चालेल. पण, शरद पवार यांच्याबद्दल खालच्या पातळीत बोला. काम झालेच म्हणून समजा’ असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.

काय म्हणाले हते पडळकर | आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात बुधवारी सायंकाळी दगडफेक करण्यात आली आहे. तत्पूर्वी सकाळी त्यांनी सोलापूर येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ते मोठे नेते आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोणी तसं मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे,’ अशी बोचरी टीका पडळकर यांनी केली होती.

 

Team Global News Marathi: