विरोधकांनी ही निवडणूक नाही लढवली तर महाराष्ट्रावर उपकार होतील – संजय राऊत

 

मुंबई | विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडी सरकारमध्ये जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच याच मुद्द्यावरून भाजपने सुद्धा आपली रणनीती लवकरच जाहीर करणार असल्याचे बोलून दाखविले होते. यावर आता शिवसेना नेते आणि कसदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसच्या वाट्याला गेले आहे. त्यामुळे पुढचा अध्यक्ष त्यांचाच असेल. महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल. विरोधकांनी ही निवडणूक नाही लढवली तर महाराष्ट्रावर उपकार होतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असावा हा काँग्रेसचा प्रश्न आहे. यावर मुख्यमंत्री, राष्ट्रवादी आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा झाली असेल, असं संजय राऊत यांनी सांगितलं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत यांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यावर सूडबुद्धीने होणाऱ्या ईडीच्या कारवायांवरही टीका केली. जे सत्ता स्थापन करण्यात किंवा सत्तेत महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्यावर कारवाया केल्या जातात. एका कारखान्यावर लाखों लोकांचं जीवन अवलंबून आहे. कारवाई करण्याची धमकी दिली जात आहे. हे निर्मळ राजकारण नाही, अशी टीका राऊतांनी केली आहे.

Team Global News Marathi: