काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पंतप्रधान मोदींच्या दाढीवर केले सूचक भाष्य |

 

नवी दिल्ली | काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या दाढीच्या मुद्द्यावरून टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी एका इंगर्जी शब्दाचा दाखल देत ही टीका केली आहे. शशी थरूर यांनी एक नवीन शब्द शिकला आहे, जो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. हा शब्द आहे ‘Pogonotrophy’. या इंग्रजी शब्दाचा अर्थ दाढी वाढविणे. शशी थरूर यांनी या शब्दाचा अर्थ सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लांब दाढीने याचा उपयोग केला आहे.

वास्तविक एका वापरकर्त्याने शशी थरूर यांना सांगितले होते की, “मी एक नवीन शब्द शिकण्याची प्रतीक्षा करीत आहे.” यावर शशी थरूर यांनी उत्तर दिले, “माझा अर्थशास्त्रज्ञ मित्र रतीन रॉय यांनी मला ‘Pogonotrophy’ हा नवीन शब्द शिकवला आहे, ज्याचा अर्थ दाढी वाढवणे आहे. पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साथीच्या काळातही दाढी वाढवून ठेवली आहे असे त्यांनी म्हंटले आहे.

यापूर्वी सुद्धा शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या दांडीच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली होती. आधीही त्यांनी देशाच्या जीडीपीची तुलना पंतप्रधान मोदींच्या दाढीशी केली आहे. थरूर यांनी पीएम मोदी यांच्यासह जीडीपीच्या आकडेवारीसह पाच छायाचित्रे ट्विटरवर वर्ष २०१७ ते २०१९-२० पर्यंतचे शेअर केले होते. तसेच या ट्विटची जोरदार चर्चा सुद्धा झाली होती.

 

Team Global News Marathi: