रात्री कोणाला अटक झाली तर…; चंद्रकांत पाटील यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ |

 

नाशिक | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नेहमीच आपल्या हटके विधानामुळे चर्चेत राहणारे नेते आहेत त्यात त्यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा नव्या चर्चेला उधाण आले आहे. त्यात आघाडी सरकारच्या नेत्यांवर तसेच आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना दिसून येत आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांमुळे नेते अडचणीत आले असताना चंद्रकांत पाटील यांनी एक सूचक विधान केलं आहे.

चंद्रकांत पाटील सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱयादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. पत्रकार परिषद संपल्यानंतर पाटील तिथून निघाले. त्यावेळी त्यांच्या आसपास भाजपचे पदाधिकारी होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांच्या मुक्कामाबद्दल प्रश्न केला. त्यावर त्यांनी ‘मी इथेच आहे. काय माहीत, रात्रीच कोणाला अटक झाली तर तुम्हाला प्रतिक्रिया द्यावी लागेल ना’, असं विधान केलं.

चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली. पाटील नेमकं काय सुचवू पाहत आहेत, त्यांनी कोणाच्या अटकेबद्दल विधान केलं आहे, अशी चर्चा त्यानंतर रंगली. सध्या महाविकास आघाडीतले नेते आणि आमदार ईडीच्या आणि सीबीयाच्या रडारवर आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी सूचक विधान केले आहे.

Team Global News Marathi: