“शरद पवारांना राष्ट्रपती करायचं असेल तर..” प्रवीण दरेकर म्हणतात की,

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू आहे. यावरून अनेकांनी आपली मते मांडली होती. अशातच विधान परिषदेचे प्रविण दरेकर यांनीही यावरून टोला हाणला आहे.

राष्ट्रपती कधी करणार आता करणार की, पुढच्या निवडणुकीनंतर करणार, आता राष्ट्रपती करायच म्हटलं तर सत्ता भाजपची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे राष्ट्रपती करायचं झालं असेल तर प्रशांत किशोर हे मोदींना भेटून आलेत का?, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.

तसेच पंकजा मुंडे यांचा संदर्भात भाष्य करताना दरेकर म्हणाले की, आमच्या काल ही नेत्या होत्या, आज ही आहेत आणि उद्या ही राहतील. पंकजा मुंडे नाराजी दूर झाली आहे. कार्यकर्त्यांची नाराजी थोडी असेल तर त्यांची देखील नाराज निश्चित दुर केली जाईल, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. मात्र शरद पवारांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Team Global News Marathi: