….तर जन आशीर्वाद यात्रेला विरोध करणार, आमदार वैभव नाईक यांचा इशारा

 

सिंधुदुर्ग | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या विधानानंतर राज्यातील वातावरण तापू लागले होते. त्यातच आज पासून पुन्हा एकदा राणे यांच्या जण आशीर्वाद यात्रेला सुरवात झाली आहे. मात्र यावेळी सेनेने सज्जन दमच दिला आहे. शिवसेनेचा जन आशीर्वाद यात्रेला विरोध नाही. पण नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप किंवा टीका केली तर आम्ही जन आशीर्वाद यात्रेला विरोध करणार, असा इशारा शिवसनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा हा कुणाला असतो हे कळणाऱ्याला माहीत असतं, असा सूचक विधानही नाईक यांनी केलं. तर, दुसरीकडे रत्नागिरीतून राणेंची यात्रा सुरू होत असल्याने ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पुढे बोलताना नाईक म्हणाले की, उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. त्यासाठी हे होर्डिंग लावण्यात आले आहेत. शिवसेनेचा जन आशीर्वाद यात्रेला विरोध नाही पण नारायण राणे यांनी जर उद्धव ठाकरेंवर आरोप किंवा टीका केली तर मात्र आम्ही यात्रेला विरोध करणार, असा इशारा नाईक यांनी दिला आहे.

पुढे बोलताना नाईक म्हणाले की, राणेंची मुले जर उद्धव ठाकरेंवर टीका करतील तर जन आशीर्वाद यात्रेला आमचा विरोध राहील. पोलीस प्रशासन आपल्या पद्धतीने काम करत आहे. राणे हे सुद्धा केंद्रीय मंत्री आहेत, उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने संयम ठेवला पाहिजे. कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे. एक बाजूने संयम कधी राहणार नाही, दोन्ही बाजूने संयम ठेवला तर तो राहील, असंही ते म्हणाले.

Team Global News Marathi: