राणेंच्या घराबाहेर जाऊन ताकद दाखवणाऱ्या मोहसीन शेख याला आदित्य ठाकरेंकडून मोठं बक्षीस

 

मुंबई | भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू निवासस्थानाबाहेर राडा करणाऱ्या युवासेनेच्या कार्यकर्त्याला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंकडून मोठं बक्षीस मिळालं आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडून युवासेना सहसचिवपदी मोहसीन शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी मोहसीन यांचं अभिनंदन करणारं ट्विट केलं आहे.

मोहसीन शेख हा युवासैनिक जुहू इथल्या मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर आंदोलनात सर्वात पुढे होता. यावेळी पोलिसांनी त्याला कपडे फाटेपर्यंत मारले होते. या मारहाणीत मोहसीन जखमी झाल्यानं त्याला रूग्णालयात दाखल केले होते. त्याला पोलीस मारहाण करतानाची क्लिप व्हायरल झालीय. जी पाहून अनेकजण हळहळले होते. राणे-सेना आंदोलावेळी राणे समर्थकांशी पंगा घेतल्यानेच शेख याची युवासेना सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आदित्य ठाकरे यांनी मोहसीन शेख यांची सहसचिवपदी नियुक्ती केली. पण ही नियुक्ती तात्पुरत्या स्वुरुपातील असून सहा महिन्यानंतर पदाधिकाऱ्याचे काम बघून कायम करण्यात येईल, असं युवासेना मध्यवर्ती कार्यालयाने सांगितले आहे.

 

Team Global News Marathi: