“हिम्मत असेल तर रस्त्यावर येऊन दाखवा,” प्रसाद लाड यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक !

 

वेळ आली तर शिवसेना भवन तोडू असे वक्तव केल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शनिवारी माहीम येथील एका कार्यक्रमात केले होते, त्यांच्या या विधानावरून पनवेलमधील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी पनवेलच्या कळंबोली शहरात भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

कळंबोली शहरात महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वात हे निदर्शन करण्यात आले. शिवसेना शाखेपासून ते कारमेल शाळेच्या चौकापर्यंत रॅली काढत हा निषेध नोंदवण्यात आला. तसेच लाड यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पनवेल येथे शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनादरम्यान लाड यांच्याविरोधात जोरादार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच यावेळी लाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्यानंतर भारतीय जनता पक्ष सत्तेपासून दूर असल्याने याचाच राग मनात धरून हे सर्व सुरु आहे.

आज पाण्यातून मासा काढल्यावर तो जिवंत राहू शकत नाही तशी भाजपाची सत्तेतून दूर गेल्यावर परिस्थिती झालेली आहे. जे लोक जनतेतून निवडून येऊ शकत नाहीत असे लोक भाजपाने आयात केले आहेत. प्रसाद लाड तुम्ही कोण तुम्हात ? तुमची पार्श्वभूमी एकदा स्वतः तपासा. एकेकाळी तस्करी करणारी व्यक्ती, भूखंड घोटाळा करणारी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. अशा प्रकारची वक्तव्ये करण्यासाठी भाजपने त्यांना सोडले आहे,” अशा शब्दांत पनवेल शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी लाड यांच्यावर टीका केली.

Team Global News Marathi: