… शंभर अपराध भरले की फटका बसतोच; शालिनीताईंचा अजित पवारांवर टीका

 

जरंडेश्वर कारखान्यावर करण्यात आलेल्या ईडीच्या कारवाईवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यात या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणी वाढताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीर आता जरंडेश्वर कारखान्याच्या संस्थापक आणि माजी संचालक शालिनीताई पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारवार निशाणा साधला आहे.

अजित पवार यांनी सत्तेचा गैरवापर करुन माझ्याकडून हा कारखाना बळकावला, असा आरोप कारखान्याच्या माजी संचालक शालिनीताई पाटील यांनी केला. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपामुळे हा कारखाना ईडीने जप्त केला आहे. यावर प्रतिक्रिया त्या म्हणाल्या की, देवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोच.

एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्यात की, आमच्या कारखान्यावर कर्जाचा हफ्ता केवळ ३ कोटींचा असताना त्यांनी विकला. वास्तविक आमच्या खात्यात ८ कोटी रुपये होते. मात्र, बँकेत सत्ता अजित पवारांची आणि खरेदी करणारेही अजित पवारच असल्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही. त्यांनी सत्तेचा पुरेपूर गैरवापर केला. २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. थोडा उशीर झाला पण आम्हाला न्याय मिळाला. आम्ही चार जणांनी अर्ज केला होता.

२०१९ मध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला होता. त्यावेळी एफआयआर दाखल करुन ईडीने दखल घेतली होती. त्यांनी मान्य केलं होते की भ्रष्टाचार झाला. मला आनंद आहे २७ हजार सभासदांना न्याय मिळाला आहे अशी प्रतिक्रिया शालिनी पाटील यांनी दिलेली आहे.

Team Global News Marathi: