प्रेमळ बायको असूनही बाहेर परस्त्री जीव लावत असेल तर तो तिढा कसा सोडवावा??

प्रेमळ बायको असूनही बाहेर परस्त्री जीव लावत असेल तर तो तिढा कसा सोडवावा??

मयुरी महाजन

नात्यांच्या चौकटीत नेहमीच एका नात्याची असलेली वीण हे अन्य कितीतरी नात्यांनी सुद्धा बांधलेली असते, नातं रक्ताचं असो कि मानलेलं, त्याला जीव लावला तर ते कायम जपलं जातं, परंतु नात्यांच्या बंधनात प्रत्येक नात्यासाठी एक जागा असते, आणि त्याला मर्यादाही असतात, तसे तर प्राणीमात्रांनाही आपण जीव लावतोचं, पण ती जागा जशी वेगळी तशी बाकी गोष्टींचीसुद्धा…

असं नेहमी म्हटलं जातं, की माणूस हा नावीन्याच्या शोधात असतो, त्याला नेहमीच काहीतरी नवीन पाहिजे असतं ,मग त्यात नवीन चालना देणारा विषय असेलं, नवनवीन माणसांसोबतच्या गाठी भेटी असतील ,असं बरंच काही नाविन्य….

बायको आपल्या संसाराचा खरा आधार असते ,आणि त्यामुळेच आपल्या संसाराला शोभाही असते, तिच्या कुंकवासोबत ती अख्ख्या जगाला हरवण्याची क्षमता ठेवते, एका स्रीविना प्रत्येक पुरुष अपूर्ण आहे ,ते या अर्थी की जेव्हा एक आई मुलाला जन्म देते ,तेव्हा पुरुषाच्या आयुष्यात स्री ही आईच्या भूमिकेत, नंतर बहिणीच्या, नंतर वहिनीच्या ,नंतर मैत्रिणीच्या ,नंतर प्रेयसीच्या ,आणि नंतर बायकोच्या …..खूप सार्‍या प्रसंगातून व्यक्तीला आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती स्री ही हवीचं, तिच्या शिवाय अपूर्ण तो आणि त्याच्याशिवाय अपूर्ण ती सुद्धा….

घरी प्रेमळ बायको असूनही जर बाहेर परस्त्री जीव लावत असेलं, तर तो तिढा कसा सोडवावा??? सर्वात आधी आपण हे स्पष्टपणे बघूया, की कोणी कोणाला जीव लावावा हे आपण ठरवू शकत नाही, हा आपण कोणाला जीव लावावा हे आपण ठरवू शकतो, पण अन्य कुणावरती त्यासाठी आपण जबरदस्ती करूचं शकत नाही,

कारण हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, जर कोणी तुम्हाला जीव लावत असेल तर त्या जीव लावण्याला कुठल्या नात्याचं पावित्र्य आहे, हे पडताळून पाहणे गरजेचे आहे, परस्री जीव लावत असेल तर ती एका चांगल्या मैत्रिणीच्या हक्काने लावत असेलं, तर त्यात वावगे असे काहीच नाही ,

परंतु त्या जीव लावण्याच्या पाठीमागे जर काही अपेक्षांची पूर्तता व्हावी ,हा हेतू असेल तर मात्र त्या व्यक्तीने जो जीव आपल्याला लावलेला आहे, त्याचा मान राखून तुम्ही त्या व्यक्तीला आपल्या नात्याची एक चौकट ठरवून देऊ शकता, म्हणजेच अन्य नात्यावरती त्याचा गैर परिणाम होण्यापासून आपण थांबवू शकतो,

बाहेर परस्त्री जीव लावत असेलं, तर तिच्या आयुष्यात एखादी पोकळी निर्माण झालेली आहे का???ती भरून काढण्यासाठी ती अन्य ठिकाणी आपली भावनिक गुंतवणूक करू इच्छिते, या विषयावरती एका मैत्रिच्या हक्काने आपण बोललं पाहिजे,

कारण काही गोष्टी या टोकाला जाण्याच्या आतच आपण त्याला आळा घालू शकतो, आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी आपण एका आपल्या मैत्रिणी साठी काय करू शकतो, जेणेकरून ती पोकळी न वाढता चुकीची समज न ठेवता, आपण मदत करू शकत असणारं, तर नक्की करावी, किंवा आपल्याला जमत नसेलं, तर तितक्याच हक्काने आणि सामंजस्यपणे नाही म्हणायलाही शिकायला हवे,

आपली बायको प्रेमळ आहे, तरी घराबाहेर परस्त्री जीव लावते, यामध्ये नात्यांच्या समीकरणात गैरसमजाची कुठेही फुंकर लागता कामा नये, गैरसमजामुळे मोठी नाती सुद्धा जमीनदोस्त होतात, आणि त्यातही विशेष म्हणजे आपणही नात्याच्या त्या विश्वासाला खऱ्या अर्थाने पात्र आहोत का ??हे बघायला हवे, अन्यथा तिढा सोडवण्याऐवजी तुम्ही त्यामध्ये भरकटत गेलात, तर मात्र तिढा वाढत जाईलं, मन हे चंचल आहे, ती कुठे गुंतण्याचा धाक असतो, पण त्यालाही आपल्या हातात ठेवणे गरजेचे असते, अन्यथा परस्री जीव लावते, म्हणून आपणही त्याला दिलेला दुजोरा महागात पडू शकतो,

आयुष्य खूप सुंदर आहे, प्रत्येक परिस्थितीत साथ देणारी माणसं खूप नशीबाने मिळतात ,ज्यावेळेस संपूर्ण जग आपल्याला नाकारते, तेव्हा आपल्याला पत्नी म्हणून खरा भक्कमतेचा आधार देणारी आपली बायकोचं असते ,आता त्याला काही अपवाद असतील, ती गोष्ट वेगळी…. कारण प्रत्येक व्यक्ती एक स्वतंत्र घटक आहे,

तुमच्या समोर हा तिढा कधी उद्भवलेला आहे का??? त्यासाठी मला माझ्या अर्थाने वाटत असलेल्या टिप्स तुम्हाला सांगितल्या कशा वाटल्या नक्की सांगा…

साभार आपलं मानसशास्त्र

ग्लोबल न्युज नेटवर्क: