“पैहचान कौन?”मलिकांच्या अटकेनंतर नितेश राणेंकडून फोटो पोस्ट

 

मुंबई | मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची बुधवारी ईडीकडून चौकशी झाली. काल भल्या पहाटे ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांच्या घरी छापा टाकला होता. यानंतर नवाब मलिक यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. आता त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. दरम्यान मलिकांवर ईडीने चौकशी लावल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया जोरात येणार हे सर्वांनाच माहीत होतं. मात्र यावरून ट्विटवॉरही सुरू झालं आहे.

यातच, भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणेंची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. पैहचान कौन ? असं कॅप्शन देत जाळ्यात अडकलेल्या एका डुकराचा फोटो ट्विट केला आहे. या ट्विटवरून आता राजकीय वादंग सुरू होण्याची शक्यता आहे. नेटकऱ्यांनी या ट्विटवर भरभरून व्यक्त होत आहेत.

मलिक यांच्या अटकेनंतर राजकीय घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओक या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बुधवारी बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक झाली. या कारवाईने राज्य आणि केंद्र सरकारमधील संघर्ष तीव्र होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

Team Global News Marathi: