IAS टॉपर टीना दाबी पुन्हा चढणार बोहल्यावर करणार या व्यक्तीशी लग्न

 

नवी दिल्ली | आयएएस अधिकारी टीना दाबी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे. राजस्थान बॅचचे आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांच्यासोबत ती पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहे. खुद्द टीना दाबी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. टीना यांनी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, पुन्हा लग्न करणार असल्याचे सांगितले आहे. टीना दाबी आता एका मराठमोळ्या आयएएस अधिकाऱ्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

टीना दाबी यांचे होणारे पती प्रदीप गावंडे राजस्थान केडरचे २०१३ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. प्रदीप यांच्याबद्दल बोलायचे झाले, तर ते सध्या जयपूरमध्ये तैनात आहे. टीना दाबी या देखील जयपूरमध्येच आपली सेवा देत आहेत. प्रदीप गावंडे हे टीना दाबी यांच्यापेक्षा तीन वर्षांनी सिनिअर आहेत. तर, दोघांच्या वयात देखील खूप अंतर आहे.

२०१३ मध्ये प्रदीप यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. प्रदीप गावंडे हे मूळचे महाराष्ट्रातील असून, ते डॉक्टर देखील आहे. प्रदीप गावंडे यांचा जन्म ९ डिसेंबर १९८० रोजी महाराष्ट्रात झाला. प्रदीप यांनी एमबीबीएसची पदवी मिळवली आणि नंतर यूपीएससी उत्तीर्ण केली. ते चुरू जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. एका वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार ते जयपूरमधील स्टेट हेल्थ अॅश्युरन्स एजन्सीचे सीईओ आहेत आणि राजस्थान मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये एमडी देखील आहेत.

Team Global News Marathi: