मला ‘जनाब’ म्हणणार असाल तर तुमच्या सरसंघचालकांना काय बोलणार आहात?

 

मुंबई | एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिली असल्याने राजकारणात एकाच चर्चा रंगली आहे. यावरून भारतीय जनता पक्षाने थेट शिवसेना पक्षावर निशाणा साधला होता आता या टीकेवर शिवसेना प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. काही कारण नसताना एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिली आहे. काही संबंध आहे का? हाच खऱा डाव आहे.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, एमआयएने ऑफर द्यायची आणि मग नंतर भाजपाने यावरुन टीकेचा भडीमार सुरु करायचा. औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकतात त्यांच्यासोबत मेलो तरी जाणार नाही इतकी कडवट निष्ठा असताना उगाच हा मुद्दा काढायचा आणि आम्ही हिंदुत्वापासून दूर चाललो आहोत हे दाखवायचं. आम्ही काय मूर्ख नाही. असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.

तसेच शिवसेना मुस्लीमधार्जिणी झाल्याचं म्हणत आहेत. मी काही मोहन भागवत यांची वाक्यं घेऊन बसलो आहेत. जर मला जनाब म्हणणार असाल तर तुमच्या सरसंघचालकांना काय बोलणार आहात? मोहन भागवतांच्या नावापुढे खान किंवा जनाब जोडणार आहात का? आधी हिंदुत्व काय ते समजून घ्या, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Team Global News Marathi: