कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत अभिजीत बिचुकले पाठोपाठ करुणा शर्मा मैदानात

 

कोल्हापूर | काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर जागेची पोटनिवडणूक जाहीर झाली असून भाजपनं पंढरपूर आणि देगलूर प्रमाणं या जागेवर विजय मिळवण्याची तयारी केली आहे. भाजपनं यावेळी उमदेवारी जाहीर करण्यात देखील आघाडी घेतली आहे. भाजपनं सत्यजीत कदम यांना उमदेवारी दिली आहे.

मात्र आता कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीत नवं ट्विस्ट आलं आहे. कारण कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत करुणा शर्मा यांनी उडी घेतली आहे. येत्या मंगळवारी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे करुणा शर्मा यांनी आज पंढरपुरात जाहीर केले.कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणूक लढण्या पूर्वी करुणा शर्मा यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले.

करुणा शर्मा यांच्या निवडणुकीत उतरण्यानं ही निवडणूक आणखी चुरशीची झाली आहे. काही दिवसांपूर्वीच करुणा शर्मा यांनी नवीन पक्षाची घोषणा केली आहे. शिवशक्ती सेना असं नवीन पक्षाचं नाव असल्याचं करुणा शर्मांनी जाहीर केलं. “अनेक पक्षांनी मला प्रवेश करण्याचं आमंत्रण दिलं होतं, मात्र मी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज माझ्या सारख्या अनेक मंत्र्यांच्या पत्नींवर अन्याय होत आहे. त्यातील अनेक महिला माझ्या संपर्कात आहेत असा दावाही करुणा शर्मांनी केला होता. काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची करुणा शर्मा यांनी भेट घेतली होती. त्यानंतर करुणा यांनी आपण समाजसेविका आहोत. पुढे राजकारणातही येणार, असं सांगितलं होतं. इतकंच नाही तर आपल्याला आमदारकीची निवडणूक लढवायची असल्याचा मानसही करुणा यांनी बोलून दाखवला होता.

Team Global News Marathi: