‘मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही’; इंदुरकर महाराज निर्णयावर ठाम

 

सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लसीकरण मोहीम युद्ध पातळीवर राबवली जात आहे. तसेच दोन डोस घेतलेल्या नागरिकांना आता लोकलने प्रवास करण्याची मूभा दिलेली आहे. एकीकडे लस कोरोनावर रामबाण उपाय असताना दुसरीकडे या लस न घेतलेल्या लोकांमध्ये प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचाही समावेश आहे. आपल्या कीर्तनामुळे नेहमीच चर्चेत राहणारे इंदुरकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

इंदुरकीर महाराज काही महिन्यांपूर्वी पुत्र प्राप्तीवरुन केलेल्या वक्तव्यामुळे चांगलेच चर्तेत आले होते. आता कोरोना लसीकरणावरुन पु्न्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. नाशिकमध्ये इंदुरकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता, त्या कीर्तनातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. त्यात त्यांनी ‘कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही आणि घेणारही नाही,’ असं म्हटलं आहे.

आपल्या कीर्तनात महाराज पुढे म्हणतात की, प्रत्येकाची रोग प्रतिकारक शक्ती वेगवेगळी आहे. प्रत्येकाच्या मेंदूची क्षणता वेगवेगळी आहे. मी तर अजून लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन काय करायचं. कोरोनावर एकच औषध आहे, मन खंबीर ठेवा असं विधान करून समाजमध्ये लस न घेण्यसासंदर्भात प्रबोधन करत असल्याचे दिसून येत आहे. समाज प्रबोधनाचे धडे देणऱ्या कीर्तनकारानेच कीर्तनातून लस घेतली नाही आणि घेणार नाही असे सांगितल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Team Global News Marathi: