“ज्यांच्या हातात बॉम्ब असतील त्यांनी डिस्पोज करावं नाही तर.”

 

राज्यात ड्रग्स प्रकांरे चन्गलेच गाजत असून याच मुद्दयावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या पाठोपाठ विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले होते. त्यापाठोपाठ फडणवीसांनी देखील मलिक यांच्याबद्दलचे काही पुरावे आपण दिवाळीनंतर देणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, फडणवीसांच्या या आरोपावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत फडणवीसांना टोला लगावला आहे.

राऊत म्हणाले की, ‘बॉम्ब लगेच फुटले पाहिजेत. नाहीतर ज्याच्या हातात आहेत बॉम्ब त्यांच्या हातातच ते फुटतात. त्यामुळे हातात बॉम्ब वगैरे असतील तर ते डिस्पोज करा. कोणाकडे बॉम्ब असेल असं राजकीय नेते सांगत असतील तर ते स्वत:च्या जीवाशी खेळतायत,’ अशी प्रतिक्रिया राऊत यांनी या राजकीय बॉम्बबद्दल बोलताना दिली.

तसेच ‘ताबडतोब त्यांनी एक तर बॉम्ब फेकला पाहिजे किंवा तो संपवला पाहिजे. देवेंद्रजींच्या हातात काही बॉम्ब असेल तर त्यांनी फोडावा ना दिवाळी संपायची कशाला वाट पहायची,’ असे यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना राऊत म्हणाले आहेत.

‘या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचे अंडरवर्ल्डशीसंबंध नाही. मी भाजपामधले १० पदाधिकारी देऊ शकतो. जे तुरुंगांमधून शिक्षा भोगून बाहेर आहेत आणि आज पक्षाचे पदाधिकारी आहेत. कोल्हापूरातून कोणं आलं आहे, चेंबूरमधून कोण आलंय. कोण कोणत्या गँग चालवत होते हे मी द्यायचं ठरवलं तर माझ्यासारखा तज्ज्ञ माणूस नाही यामध्ये,’ असे राऊत म्हणाले आहेत.

Team Global News Marathi: