“मी कुणाला बलात्काऱ्याची बायको, बलात्काऱ्याची मुलं म्हणून हिणवणार नाही”

 

राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यातील शाब्दिक युद्ध अद्यापही सुरुच आहे. चित्र वाघ यांनी पुन्हा एकदा मेहबूब शेख यांच्यावर ट्विट करून जोरदार घणाघाती हल्ला चढवला आहे. तुम्ही काहीही म्हटलं तरी तुमची ओळख लाचखोर नवऱ्याची बायको हीच आहे. लाचखोर नवऱ्याच्या बायकोचं नाव वाघ असल्यामुळे मांजर वाघ होत नाही. अशी टीका मेहबूब शेख यांनी केली होती.

शेख यांनी केलेल्या टीकेला छोत्र वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे की, मला आणि माझ्या परिवारासाठी गलीच्छ भाषा वापरली जातीये. तरीही मी कुणा परिवारातील सदस्यांना बलात्काऱ्याची बायको बलात्काऱ्याची मुलं म्हणून कधीही हिणवणार नाही. कारण आमच्या बापाने हे आम्हाला शिकवलं नाही, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

विरोधकांकडे मुद्दे संपले की तिच्या बाईपणाला आणि तिच्या परिवाराला टार्गेट केलं जातं, मला हे करण्याची आवश्यकता नाही माझ्याकडे सत्ताधार्यांना गुद्दे द्यायला बरेचं मुद्दे आहेत मला राज्यातील तमाम भगिनींना सांगायचयं. या भ्याड भेकडांना भीक न घालता कणखर बना.अन्यायाविरोधात पेटून उठा मी तुमच्यासोबत आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. आता या टीकेला मेहबूब शेख कसे प्रतिउत्तर देतायत हे पाहावे लागणार आहे.

 

 

 

Team Global News Marathi: