‘मी पुन्हा येईल’, हे मी गेल्या अडीच वर्षापासून ऐकतोय, सत्यात कधी येणार तुम्हीच सांगा

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार पडाऊन भारीत्या जनता पक्षाचे सरकार येणार अशी भविष्यवाणी अनेक भाजपचे नेते करताना दिसून आले होते. त्यातच भाजपा नेत्यांकडून नव-नवीन तारखा जाहीर करण्यात आला होत्या. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मागील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी ‘मी पुन्हा येईल’ हे वाक्य चर्चेत राहिलं. एका सभेत बोलताना, मी पुन्हा येईल, असं म्हटलं होतं. यावरून फडणवीसांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. अशातच यावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

‘मी पुन्हा येईल’, हे वाक्य मी गेल्या अडीच वर्षापासून ऐकत आहे. मात्र ते सत्यामध्ये कधी येईल हे माध्यमांनीच सांगावं, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली. ते शिर्डीमध्ये रहाता विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी पाटील आले होते.

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप करणारे परमबीर सिंग देश सोडून पळून गेले आहेत. त्यांच्या आरोपावर ईडी आणि इतर यंत्रणांनी का विश्वास ठेवावा?, असा सवालही जयंत पाटलांनी केला आहे. लोकांची दिशाभूल करुन सरकारला बदनाम करण्याचे काम होत आहे. सरकार चांगलं काम करत असताना नाहक त्रास दिला जात असून लोकांपर्यंत जाण्याची गरज असल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं. यावेळी बोलताना पाटलांनी मंत्री छगन भुजबळांवरही भाष्य केलं.

Team Global News Marathi: