आता सरपंचालाही ईडीची नोटीस आली तर नवल वाटू नये

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक मंत्र्यांना आमदार आणि खासदारांना ईडीच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक चांगाईच रंगलेली दिसून येत आहे. आता त्या पॅथॉटप्प काँग्रेस नेत्या आणि मानती यशोमती ठाकूर यांनी ईडीच्या नोटीसावरून केंद्रातील मोदी सरकार आणि विरोधकांना टोला लगावला आहे.

अमरावतीत आज सहकार पॅनलने पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला संबोधित करताना यशोमती ठाकूर यांनी थेट ईडीला टोला लगावला आहे . आता उद्या ग्रामपंचायत सरपंचांना ईडीची नोटीस आली तर त्यात नवल काही राहणार नाही, असा चिमटा यशोमती ठाकूर यांनी केंद्रातलं मोदी सरकार आणि राज्यातील विरोधकांना काढला आहे.

अमरावती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची निवडणूक येत्या ४ ऑक्टोबर रोजी होत आहे. यात बँकेतील ३.३९ कोटींची आर्थिक अनियमितता झाल्याने ईडीने बँकेचे अध्यक्ष बबलू देशमुख व उत्तरा जगताप यांना अगदी निवडणूकीच्या तोंडावर नोटीस दिली आहे. त्यामुळे बँकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडलं आहे यावरच आता मंत्री ठाकूर यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

Team Global News Marathi: