मी बुधवारी पवार यांच्या विरोधात आणखी एक पोलखोल करणार

 

मुंबई | भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि क्षदर, आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या आणि नातेवाईकांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यातच आता किरीट सोमय्या यांनी अजित पवारांना पुढील कारवाईचा इशारा दिला आहे.

अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तियांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार आहे, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. यावेळी किरीट सोमय्या यांनी बोलताना जरंडेश्वर कारखान्याचा मालक कोण आहे? तसेच किती हजारांचे घोटाळे केले? असे सवाल उपस्थित केले आहेत. जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत पवारांना प्रश्न विचारत राहणार, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. तसेच आशा करतो की, या प्रश्नांची उत्तरे देण्याची त्यांच्यात हिंमत असावी, असंही किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

पवार शेतकरी दादा शेतकरी दादा म्हणत असतात. परंतु, रोहित पवार सुनेत्रा पवार यांच्या नावाने कारखाने आहेत.यांनी इतके घोटाळे केले आहेत. लुट माजवली, असं म्हणत किरीट सोमय्यांनी पवार कुटूंबावर निशाणा साधला आहे. आता सोमय्या यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काय प्रतिउत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: