सलग सातव्या दिवशी देशभरात इधनवाढ- पेट्रोल डिझेल सोबत घरगुती गॅस च्या किंमतीही गगनाला भिडल्या

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी सलग सातव्या दिवशी दरवाढीला आपलंसं केलं आहे. कोरोना महासाथीमध्ये आर्थिक कंबरडं मोडलेल्या नागरिकांना आता इंधन दरवाढीने हैराण करायला सुरुवात केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढीसह एलपीजी गॅस सिलिंडरचे भाव देखील गेल्या काही दिवसांत वाढलेले आहेत. आज सोमवारी देशभरात पेट्रोल 0.30 पैशांनी तर डिझेल साधारण 0.35 पैशांनी महागल्याचं दिसून आलंय.

 

महाराष्ट्रात डिझेलने सेंच्यूरी मारली आहे. मुंबईसहित औरंगाबाद, नांदेड आणि परभणीत डिझेलच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठत शंभरी पार केली आहे. मुंबईसह मुंबई उपनगर, अमरावती, भंडारा, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये डिझेलचे दर शंभरीच्या जवळ पोहोचले आहेत. देशांतर्गत सध्या असलेले इंधनाचे दर हे आतापर्यंतचे सर्वाधिक आहेत. सध्या मध्यमवर्ग अभूतपूर्व अशा महागाईला तोंड देत असून इंधन दरवाढीचा परिणाम दळणवळणावर होऊन सगळ्या जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढण्याची चिंता आ वासून उभी आहे.

 

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. गेल्या काही दिवसांपासून या इंधन दरवाढीने सपाटाच लावला आहे. आज देखील इंधनाचे दर वाढल्याचं दिसून आलंय. आजदेखील पेट्रोल आणि डिझेलची किंमत सरासरी 0.30 पैशांनी वाढली आहे.

 

देशाची राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचे भाव 0.30 पैशांनी वाढले आहेत. या वाढीसह सध्या पेट्रोलचा भाव हा 104.44 रुपये प्रति लीटर इतका झाला आहे. तर डिझेलच्या किंमतीमध्ये 0.35 पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर डिझेलची किंमत 93.17 रुपये प्रति लीटर इतकी झाली आहे.

 

दुसरीकडे मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 0.29 पैशांनी वाढून किंमत 110.41 रुपये प्रति लीटर झाली आहे. दुसरीकडे डिझेल 0.37 पैशांनी महागले असून दर 101.03 रुपये प्रति लीटर झाला आहे. मुंबईमध्ये डिझेलच्या दराने कालच शंभरी गाठली आहे.

असे आहेत प्रमुख शहरांतील दर

दिल्ली :

डिझेल 93.17 ₹/L

पेट्रोल 104.44 ₹/L

पुणे

डिझेल 99.57 ₹/L

पेट्रोल 110.51 ₹/L

मुंबई

डिझेल 101.03 ₹/L

पेट्रोल 110.41 ₹/L

कोलकाता

डिझेल 96.28 ₹/L

पेट्रोल 105.09 ₹/L

ग्लोबल न्युज नेटवर्क: