“मी सांगितलं होतं निवडून येऊ देणार नाही, मग पाडलं काय म्हणता” अजितदादांनी सेनेच्या माजी मंत्र्याला डिवचले

 

पुणे | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांना जोरदार टोला लगावला आहे. तुम्हालाही माहिती आहे ना बाबा मीच सांगितलं होतं की पुढच्यावेळी कसा निवडून येतो तेच बघतो. अन चॅलेंज काय, मी सांगितलं होतं निवडून येऊ देणार नाही आणि काय पाडलं म्हणता, असं अजित पवार यांनी म्हटलंय.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना नियमांबाबत महत्वाची माहिती दिली. यावेळी ते बोलत होते. आता अजित पवारांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा विजय शिवतरे आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसभा निवडणुकीला देशपातळीवरील तीनही पक्षाचे नेते निर्णय घेतील आणि तो निर्णय सर्वांना मान्य असेल, असंही अजित पवार म्हणाले. त्यावेळी शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे हे लोकसभेला आघाडीसाठी अनुकूल नाहीत, असं पत्रकारांनी विचारलं. त्यावर पुन्हा एकदा अजित पवार यांनी सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं नाव घेत ते जे ठरवतील तेच होणार, असं स्पष्ट केलंय.

Team Global News Marathi: