मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याने मला शिविगाळ केली, तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचा गंभीर आरोप

 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने भाजपचा दणदणीत पराभव करून विजय मिळवला होता. मात्र विजय मिळवल्यानंतरही सत्तधारी तृणमूल आणि विरोधात असलेल्या भाजपात खटके उडताना दिसून येत होते. अशातच आता तृणमूल काँग्रेसचे खासदार शंतनू सेन यांनी मोदी सरकारमधील पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.

हरदीप सिंह यांनी राज्यसभेत आपल्याला शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप शंतनू सेन यांनी केला आहे. ईस्त्राईली स्पायवेअर पेगाससच्या मुद्यावरून पावसाळी अधिवेशनात प्रचंड गदारोळ झाला. यावेळी शंतनू सेन यांनी गैरवर्तन केल्याप्रकरणी राज्यसभेने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. या कारवाईनंतर सेन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

राज्यसभेचे कामकाज स्थगित झाल्यानंतर मी हरदीप सिंह पुरी यांच्याजवळ गेलो तर त्यांनी माझ्याशी आक्षेपार्ह भाषेत संवाद सुरू केला. तसेच त्यांनी मला शिवीगाळ करत धमकावलं देखील. यावेळी त्यांनी मला मारण्याचा देखील प्रयत्न केला, असे आरोप शंतनू सेन यांनी केले आहेत.

Team Global News Marathi: