“मुख्यमंत्री, मंत्री आणि कार्यकर्त्यांनी टोकाचे प्रयत्न… नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले

मुंबई | केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या प्रक्षोभक विधानानंतर काल पोलिसांना नारायण राणेंवर अटकेची कारवाई केली होती. दरम्यान, काल रात्रीच राणेंना जामीन मिळाला असला तरी या निमित्ताने शिवसेना आणि राणेंमध्ये निर्माण झालेला वाद अधिक वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, नारायण राणेंची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर आत राणेंचे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे.

निलेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की, काल संपूर्ण ठाकरे सरकार आणि शिवसेना कामाला लागली होती. पण महाराष्ट्रासाठी नाही तर राणेंसाठी. काल आमचे जे सहकारी व कार्यकर्ते शिवसेनेला भिडले त्यांचे मनापासून आभार. शिवसेनेचे मुख्यमंत्री, मंत्री, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी टोकाचे प्रयत्न करूनसुद्धा आमचं काही उखाडू शकले नाही. औकात कळली?? असा चिमटा निलेश राणे यांनी काढला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत नारायण राणेंनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान काल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मी त्या ठिकाणी असतो तर उद्धव ठाकरेंच्या कानाखाली मारली असती, असे राणे म्हणाले होते. या विधानानंतर संपूर्ण राज्यात याचे पडसाद दिसून आले होते. तसेच युवासेनेने राणे यांच्या मुंबईतील घराजवळ आंदोलन केले होते.

Team Global News Marathi: