‘मी माझ्या कष्टाचा पैसा एका चोराला दिला याचं दु:ख वाटतं, स्वाभिमानीचे एकमेक आमदाराची स्वाभिमानी संघटनेतून हकालपट्टी

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्षप्रमुख राजू शेट्टी यांनी याबाबत गुरुवारी घोषणा केली. देवेंद्र भुयार हे गेल्या कित्येक दिवसांपासून राजू शेट्टी यांच्या संपर्कात नव्हते. तसेच पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला येत नव्हते यावरून मतदारसंघातही त्यांच्या विरोधात नाराजीचा सूर होता. गुरुवारी हिवरखेड येथे पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्षप्रमुख राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांच्या हकालपट्टीची घोषणा केली.

विधानसभा निवडणुकीत देवेंद्र भुयार यांनी कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला होता आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार म्हणून ते निवडून आले. दरम्यान आमदार देवेंद्र भुयार यांनी मंत्रिपदासाठी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे आग्रह धरला. मात्र मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक दिवसांपासून पक्षाच्या पहिल्या फळीतील नेते आणि देवेंद्र भुयार यांच्यामध्ये खटके उडत होते. देवेंद्र भुयार यांच्यावर शेट्टी यांनी आपल्या भाषणात जोरदार टीका केली आहे.

ते म्हणाले, ‘देवेंद्र भुयारबद्दल माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. तुम्ही शेतकऱ्यांचा घात केला असेल तर अशी घाण आमच्या संघटनेत राहू शकत नाही. आजपासून देवेंद्र भुयारचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संबंध नाही. त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे’, अशी घोषणाही शेट्टी यांनी यावेळी केली.

Team Global News Marathi: