मैं अपने दुशमनों का बड़ा एहतराम करता हूँ | तिसरा खळबळजनक खुलासा मलिक करणार

 

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक आज क्रुझवरील ड्रग्ज पार्टी संदर्भात पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार आहेत. मलिक आज या पार्टीच्या संदर्भात तिसरी पोलखोल करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागलेले असतानाच त्यांनी एक ट्विट केलं आहे. मलिक यांनी एक शेर ट्विट केला असून या ट्विटची आता चान्गलीच चर्चा सुरु झाली आहे.

नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हे ट्विट केलं आहे. मुख़ालिफ़त से मेरी शख़्सियत और निखरती है, मैं अपने दुशमनों का बड़ा एहतराम करता हूँ।, असं सूचक ट्विट त्यांनी केल्याने त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. नवाब मलिक आज राष्ट्रवादी भवनमध्ये पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत एनसीबीची पोलखोल करण्यात येणार आहे. त्यामुळे मलिक एनसीबीवर नवीन काय बॉम्ब टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नवाब मलिक यांनी याआधी एनसीबीला सवाल केले होते. यावेळी त्यांनी एनसीबीला एक सवाल केला आहे. क्रुझवरील कारवाईमध्ये १० लोकांना पकडलं होते, मात्र त्यापैकी २ लोकांना सोडले असल्याचे समोर आले आहे. जे दोघे सोडण्यात आले त्यामध्ये भाजपच्या एका नेत्याचा मेहुणा असून याबाबतचा भांडाफोड उद्याच्या पत्रकार परिषदेत करणार असल्याचं मलिक यांनी केला.

Team Global News Marathi: