दगडी चाळीत गवळी अन् नाईक यांची भेट घेत मुंबई मनपासाठी सेनेची राजकीय चर्चा सुरु

 

मुंबई | आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केली असून सध्या राजकीय भेटाघाटी सुरु केली आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सेनेने नवरात्र उत्सवाचा मूहुर्त साधत मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केलीय. मुंबई महापालिकेवर सत्ता अबाधित ठेवण्यासाठी प्रमूख विरोधी पक्ष भाजपशी काटेकी टक्कर द्यावी लागणार आहे.

 

 

तसेच मुंबई मनपाची ११३ हा स्पष्ट बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिवसेनेने अपक्ष आणि इतर लहान पक्षांना आपल्या पंखाखाली घेण्यास सुरवात केली आहे. शिवसेनेच्या या राजकीय रणनितीचा एक भाग म्हणून काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी थेट दगडी चाळीत जाऊन नवरात्र उत्सवातील अंबामातेचं दर्शन घेतलं. याच उत्सवात वंदना गवळी, गीता गवळी आणि प्रदिप गवळी यांच्या सोबत अर्धा तास राजकीय चर्चाही केली.

त्यानंतर १४४ वाँर्ड मधील टेनामेंट नवरात्र उत्सवात जाऊन संतोषी मातेचं दर्शन घेतलं. यावेळीही आश्विन नाईक आणि अंजली अमर नाईक यांची भेट घेऊन त्यांच्याशीही अर्धातास राजकीय चर्चा केली. या दोन्ही ठिकाणच्या नवरात्र उत्सवात झालेल्या राजकीय गाठी-भेटींमुळे शिवसेनेची मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणनिती संदर्भात चर्चा सुरू झालीय. शिवसेनेला स्पष्ट बहूमत गाठण्यासाठी काही अपक्ष आणि लहान पक्षांच्या नगरसेवकांची मोट बांधावी लागू शकते.

Team Global News Marathi: