मला चांगलं राहायला आवडते ; माणसानं लॅव्हिश राहू नये का? नितीन राऊत यांचा विरोधकांना प्रतिसवाल

मुंबई : राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रशस्त घरातील झगमगाट आपण पाहिला असाल तर आता राज्यातील मंत्रालयातील कारभाराचे धिंदवडे काढणारी एक घटना सकाळी घडली आहे. राज्याचा कारभार ज्या ठिकाणाहून चालवला जातो त्या मंत्रालयातच पुन्हा एकदा विद्युत पुरवठा बंद झाला. त्यामुळे मंत्र्यांची बत्ती गुल झाली. अनेक मंत्र्यांची दालने अंधारात होती. मंत्रालयातील एका विद्युत फेजमध्ये बिघाड झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला, अशी सारवासारव प्रशासनातर्फे करण्यात आली.


दरम्यान, भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ऊर्जामंत्र्यांच्या सरकारी कार्यालयाचे आणि घराचे फोटो शेअर केलं होतं. यामध्ये ऐषोरामात अजून काही कसर बाकी असल्यामुळे गोर-गरीब, शेतकरी आणि सामान्यांची वीज तोडण्याची जोरदार मोहीम राज्यात सगळीकडे सुरू असावी, असं म्हणत नितीन राऊत यांच्यावर टीका केली होती. तसेच राज्यात  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्जामंत्र्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीही भाजपाने केली आहे.

स्वतः ४८ लाखांची बिले लावून चार्टेड विमानाने फिरणारे उर्जामंत्री यांच्या विभागातही अंधःकार असल्याचे दिसून आले. कारण त्यांच्या राज्यात मंत्रालयात यापूर्वीही १२ जानेवारी रोजी विद्युत यंत्रणा जळाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. यामुळे एकनाथ शिंदेसह अनेक मंत्र्यांची दालने अंधारात होती. वीज नसल्याने अनेक विभागाची कामेही खोळंबली होती. मंत्रालयाच्या जुन्या अनेक इमारतीच्या चौथ्या मजल्यावर हे शॉर्ट सर्किट झाले होते. त्यामुळे विद्युत यंत्रणा जळून पुरवठा खंडीत झाला. दुरुस्तीचे काम करून अखेर विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात आले होते.

गेल्या वर्षी ३० मार्च २०२० रोजी व २०१२ रोजी मंत्रालयात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून मोठं नुकसान झाले होतं. शॉर्ट सर्किट होऊन हा अनर्थ टळला. पण मंत्रालयात वायरिंग शॉर्ट सर्किट तसेच यंत्रणेवर अतिभार आल्याने अनेक वेळा विद्युत पुरवठा खंडित होतो. मंत्रालयातील वीजपुरवठा खंडित झाला यानंतर तासाभराने विद्युत पुरवठा सुरळीत झाला मात्र विद्युत पुरवठा का खंडित झाला होता याचे कारण अध्याप प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, हजारो लोकं आपली काम घेऊन मंत्रालयात येतात आणि हे असं होणं राज्याचा दृष्टीने फार गंभीर आहे .त्यामुळे मंत्रालयातील विद्युत व्यवस्थेकडे नीट लक्ष देणे गरजेचे असल्याचे चित्र सध्या आहे.

मला लॅव्हीश रहायला आवडतं!

उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अलिशान घराचे फोटो शेअर करुन त्यांच्यावर भाजपने निशाणा साधला होता. त्यापूर्वी त्यांनी चार्टेड विमानाने प्रवास करुन ४८ लाखांची विजबिले कंपन्यांना दिली होती. राज्यात विधानसभेत एकीकडे शेतकऱ्यांचे विज कनेक्शन कापणार नाही, अशी हमी देण्यात आली होती. मात्र, विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा एकदा कनेक्शन तोडण्यात अधिकारी कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवली होती. त्याला डॉ. नितीन राऊतांचा पूर्ण पाठींबा होता. तसे आदेश सरकारकडून आल्याचे वीज कंपन्यांनी सांगितले होते. जनतेच्या डोळ्यात अशाप्रकारे धूळफेक करुन डॉ. नितीन राऊत यांनी या सर्व प्रकारांना उत्तर देताना मला लॅव्हीश रहायला आवडतं, असे उत्तर दिले आहे.

 

माझा जन्म जरी गरीब घरात झाला तरी मी पायलट होतो. त्यावेळीही मी खर्च करु शकत असल्याने असाच रहायचो. मला चांगलं राहायला आवडतं. आताही मी नियमबाह्य कोणतीही गोष्ट केली नाही, असं नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग नियमांच्या अधिन राहून जे काम करत, ते काम सुरू आहे. लोकांना जे समजायचं ते समजावं. फोटोत दिसत असलेला टीव्ही मी माझ्या खर्चाने आणला आहे. माझ्या आधीच्या घरी मोठा टीव्ही होता. तुम्ही इतर मंत्र्यांचे बंगले पाहिले तर ते देखील तसेच आहेत असंही नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

नितीन राऊत पुढे म्हणाले की, मी दलित समाजाचा व्यक्ती आहे. आम्ही टीकाकारांसाठी सॉफ्ट वेपन असतो. सगळेजण आमच्यावर टीका करतात, आम्ही काही काम करू शकत नाही असा आरोप करतात. आरोप करणाऱ्या बातम्या कोण चालवतं हे बघितलं पाहिजे. नुसतं बातम्या चालवल्याने काही होत नाही, बातम्या बघून पक्षश्रेष्ठी काही माझं खात काढणार नाही. ते माझ्याकडे राहणार आहे, असं स्पष्टीकरणही नितीन राऊत यांनी दिलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: