चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना ‘या’ कारणासाठी पुरस्कार देण्याची केली मागणी

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या अडचणीत भर घालताना दिसत आहे. त्यात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि आरोग्यमंत्री टोपे यांना जोरदार टोला लगावला आहे.

या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हणतात की, देशात कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण असणाऱ्या हॉटस्पॉट जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ९ जिल्हे आहेत. हे अतिशय धक्कादायक आहे. या उल्लेखनीय निष्क्रिय कामगिरीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विशेष पुरस्कार दिला पाहिजे ! असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्यात देशातील सर्वात सक्रिय रुग्ण असणाऱ्या हॉटस्पॉट जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांचा समावेश आहे . मात्र अदयाप या प्रकरणावर राज्य सरकार गंभीर नसल्याचा ठपका चंद्रकांत पाटलांनी ठेवला आहे. विशेष सध्या राज्यातील आरोग्य यंत्रणा कोरोना रोखण्यात निष्क्रिय आहे अशी टीका विरोधकांनी केली आहे.

Team Global News Marathi: