” माझ्या कानावर आलंय, चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार, त्यांना शुभेच्छा”

 

 

“मला माझी मंत्री म्हणूं नका” असे विधान भाजपा प्रदेशाद्यक्ष चंदकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले होते. त्यांच्या या विधानावरून विरोधकांनी जोरदार टोलेबाजी केली होती. आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला आहे. : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नागालँडचे राज्यपाल होणार असल्याचं माझ्या कानावर आलं. त्यांना राज्यपालपदाची ऑफर आली होती. त्यामुळेच त्यांनी माजी मंत्री म्हणू नका असं म्हटलं असावं असा टोला लगावला आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, द्रकांत दादा हे आमचे मित्रं आहेत. राजकारणात आम्ही एकमेकांवर टीका करत असतो. ते म्हणाले माजी मंत्री म्हणू नका. चमत्कार होणार आहे. चंद्रकांतदादा अवतारी पुरुष आहे. चमत्कारी पुरुष आहेत. ते काही तरी चमत्कार घडवतील. पण माजी मंत्री म्हणण्मयाची त्यांची वेदना समजू शकतो.मी त्यांना निरोप पाठवला आहे.

 

ते पुढे म्हणाले की,  तुम्हाला २५ वर्षे माजी मंत्री म्हणूनच राहावे लागेल. उद्धवजींच्या नेतृत्वात सरकार कायम राहणार आहे. त्यांनी मनाची तयारी करावी. स्वप्न बघण्यावर कोणताही टॅक्स लागेला नाही. जीएसटी लागलेला नाही. ते नागालँडचे राज्यपाल होणार आहेत. त्यांना ऑफर आली असं माझ्या कानावर आलं. त्यामुळे त्यांना माजी म्हणून घ्यायचं नसेल, असं राऊत म्हणाले.

Team Global News Marathi: