“सोनू सुदवर आयकरच्या धाडी म्हणजे विरोधकांचा रडीचा डाव”

 

मुंबई | लॉक डाऊनमध्ये परप्रांतीयांसाठी देवदूत ठरलेला सोनू सूद यांच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. सोनू सूदच्या घरी आणिऑफिसमध्ये छापे टाकल्यानं बरीच चर्चा रंगली होती. याच पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून भाष्य करत केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका करण्यात आली आहे.

सोनू सूदच्या घरी आणिऑफिसमध्ये छापे टाकल्यानं आलेल्या मुद्द्यावरून शिवसेनेनं आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. सोनू सूदला खांद्यावर घेऊन मिरवणाऱ्यांत भाजप पुढे होता. सोनू सूद हा आपलाच माणूस असल्याचे त्यांच्याकडून सतत बिंबविण्यात येत होते, पण या सोनुने दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ म्हणून सामाजिक कार्य करायचे ठरवताच त्यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत अशी शंका शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये अभिनेता सोनू सूदने केलेल्या मदत कार्याचा देशभर गवगवा झाला. त्यातून सोनू सूदला ‘मसीहा’ ही पदवी आपसूकच बहाल झाली, अशा खोचक शब्दात शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे. भाजपाकडून आपल्या विरोधी विचारांच्या पक्षांना आणि व्यक्तींना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप आजच्या अग्रलेखात करण्यात आला आहे.

Team Global News Marathi: