“मी म्हातारा होईपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री होत नाहीत”

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या उस्मानाबाद दौऱ्यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती. देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ वक्तव्यावरून शरद पवारांनी फडणवीसांना टोला लगावला होता. ही आघाडी यशस्वी झाली असल्याचं शरद पवार म्हणाले. तर निवडणूक लागण्याआधी, निकाला आधीच काही लोक मी येणार, मी येणार सांगत होते. पण आम्ही काय येऊ देतो, असा टोला शरद पवारांनी लगावला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवारांची री ओढत फडणवीसांवर टीका केली आहे.

शरद पवार डिवचत नसतात ते कार्यक्रमच करतात. मी म्हातारा होईपर्यंत आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. मी ६३ वर्षांचा होईपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत. म्हणजे ते झग झग म्हातारे होतील आणि त्यांचे पाठराखण करणारे वार्धक्याकडे झुकलेले असतील, असा घणाघात अमोल मिटकरींनी केला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचा नादच करू नये. पुढचे 25 वर्षे तरी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहू नयेत, असा टोला देखील अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. तर पडळकरांना जास्त गांभीर्याने घ्यायची गरज नाही म्हणत मिटकरींनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनाही टोला लगावला आहे.

Team Global News Marathi: