“मी आजही हिंदूच, नवाब मलिक यांच्या टीकेला समीर वानखडे यांचे सडेतोड प्रतिउत्तर

 

अभिनेता शाहरुख खान यांचा पुत्र आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक विरूद्ध एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा वाद दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. अशातच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचे फोटो व्हायरल करत वानखेडे मुस्लीम असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता समीर वानखेडे यांनी मलिकांच्या आरोपावर उत्तर दिलं आहे.

समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी समीर वानखेडे यांचा निकाहनामा खरा असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर नवाब मलिकांनी कोणाच्याही खासगी आयुष्यात डोकावू नये, असा सल्ला देखील ज्ञानदेव वानखेडे यांनी दिला होता. त्यानंतर आता समीर वानखेडे यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणावर भाष्य केलं आहे. तसेच सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

आमचा विवाह मुस्लीम पद्धतीने व्हावा, अशी माझ्या आईची इच्छा होती. विशेष विवाह कायद्यांर्गत माझ्या विवाहाची नोंद केली असल्याचं देखील समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे. मी जन्माने हिंदू असून, मी दलित कुटुंबातील आहे. मी आजही हिंदूच आहे आणि मी कधीही धर्मांतर केलेलं नाही, असंही वानखेडे म्हणाले आहेत.

 

 

Team Global News Marathi: