मी मंत्रीपदाची मागणी केलेली नाही, जी जबाबदारी देतील ते पार पाडेन – नाना पटोले

 

मुंबई | सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटकपक्ष आगामी विधानसभा निवडणूक एकत्र आणि जोमाने लढतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. मात्र, काँग्रेस आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढेल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने सांगत होते.

मात्र नुकतच दिल्लीवारी करून आलेले नाना पटोले यांनी आपला स्वबळाचा नारा काहीसा बाजूला ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्यावर कोणताही मंत्री नाराज नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे स्वबळाचा नारा देणाऱ्या नाना पटोले यांनी आता माघारी घेतली आहे.

तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं होतं. त्यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनातील तिनही विषय महत्वाचे असल्याचं एक पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. राज्यपालांच्या या पत्रावरुन नाना पटोले यांनी राजपाल आणि भाजपवर खोचक शब्दात टीका केली आहे. राजभवन हे एकप्रकारे भाजपचं कार्यालय झालं आहे. देशात पहिल्यांदाच असं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यपाल हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे वागत आहेत, असा घणाघात पटोले यांनी केला होता.

Team Global News Marathi: