दगडफेकीनंतर पडळकर आक्रमक, रोहित पवारांचा फोटो केला ट्विट!

 

भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी रात्री दगडफेक झाली. दगडफेकीनंतर पडळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीला थेट इशारा देताना दगडच काय गोळी घातली तरी मी शांत बसणार नाही, असा पवित्रा पडळकर यांनी घेतला.

तसेचच एवढ्यावरच न थांबता त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा दगडफेक केलेल्या आरोपीसोबतचा फोटो ट्विट करुन राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करून राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला आहे. प्रस्थापितांनी बहुजनांवर हल्ला केलाय. पण अश्या भ्याड हल्ल्यानं बहुजनांचा आवाज ना काल दबला होता ना आज दबला आहे, ना उद्याही दबेल… घोंगडी बैठका सुरूच राहणार…, असं ट्विट करत पडळकरांनी राष्ट्रवादीला ललकारलं आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा कॅमेरात कैद झाला आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज अशी घोषणा देत गाडीवर भला मोठा दगड टाकून संबंधिताने तिथून पळ काढला. पडळकर समर्थकांनी मोटारसायकलवर पाठलाग केल्यानंतर सुद्धा दगडफेक करणारा हाती लागला नाही. सोलापुरातील श्रीशैल्य नगर अक्क महादेवी मंदिर येथे ही घटना घडली.

 

Team Global News Marathi: