” मी कोऱ्या पाकिटाप्रमाणाइ वरिष्ठ देतात ती जबाबदारी स्वीकारतो “

 

मुंबई | महाराष्ट्र भाजप नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन प्रदेश भाजपमध्ये संघटनात्मक बदल होणार असल्याच्या चर्चेला ऊत आला होता. चंद्रकांत पाटील यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद देखील काढून घेतलं जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. तसेच ही जबाबदारी तरुण आणि तडफदार नेत्याच्या हातात सोपवण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा होतं होती.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी कोऱ्या पाकिटाप्रमाणे, वरिष्ठ नेते देतात ती जबाबदारी स्वीकारतो, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांतदादांच्या या प्रतिक्रियेने त्यांनी बदलांचे संकेत दिलेत का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ते दिल्ली दौऱ्यावरून आल्यानंतर पत्रकार मद्यमांशी संवाद साधताना बोलत होते.

भाजपमध्ये चार-पाच वरिष्ठ नेते विचार करुन जबाबदारी देत असतात, त्यामुळे आपण डोके चालविण्याची गरज नसते. मी कोऱ्या पाकिटाप्रमाणे असून पक्षाने दिलेली जबाबदारी आनंदाने पार पाडतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाराज असल्याने भेटले नाहीत, या चर्चा निर्थक असल्याचं स्पष्ट केलं.

 

Team Global News Marathi: