मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज पंकजाताई आहेत – भागवत कराड

 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्री मंडळात निष्ठावंतांना डावलून काही महिन्यापूर्वी पक्षात प्रवेश केलेल्या खासदारांची केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागल्यामुळे भाजपच्या गोटात असंतोष पसरला होता. त्यात डाॅ. भागवत कराड यांना मंत्रीपद देण्यात आलं.

मात्र बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या खासदार प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात सामील करून न घेतल्यानं मुंडे समर्थक नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळत होत. तसेच मुंडे समर्थकांनी राजीनामा देण्यास सुरवात केली होती. तीन दिवसांपुर्वी पंकजा मुंडे यांनी दिल्लीवारी केली होती. त्यांनी या अचानक केलेल्या दिल्ली दौऱ्यामुळे अनेकांना धक्का बसला होता.

या दौऱ्यात त्यांनी गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. त्याचबरोबर त्यांनी डाॅ. भागवत कराड यांची देखील भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. भागवत कराड यांनी स्वतः ट्विट करत याची माहिती दिली आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, १२ जुलैला पंकजा मुंडे दिल्लीमध्ये बैठकीसाठी आल्या होत्या. त्यांची भेट घेतली. मन मोकळं झालं. मुंडे साहेबांची आठवण आवर्जून झाली. मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज ताई आहेत. त्यांनीही साहेबांच्या प्रमाणे शुभेच्छा दिल्या, असं ट्विट भागवत कराड यांनी केलं आहे.

Team Global News Marathi: