“पेट्रोल, डिझेल महागले तर काय झाले, मोफत सुविधा आणि लस मिळत आहे”

 

नगर | सध्या संपूर्ण जगभरात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. याच पार्श्वभूमीवर मागच्या वर्षभरापासून लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या असून उपासमारीची वेळ आली आहे. तसेच केंद्राने इंधन दरवाढ करून सामान्य नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. मात्र दुसरीकडे भाजपा नेते आणि खासदार वाढत्या महागाईवर वादग्रस्त विधाने करून सामान्य नागरिकांना डिवचण्याचा काम करत आहे.

पेट्रोल, डीझेल महागले तर काय झाले, त्याबदल्यात मोफत सुविधा आणि लस मिळत आहे. त्यामुळे इंधन दरवाढीविरोधात आंदोलनाचे फलक लावताना पंतप्रधान मोदी यांनी लस मोफत दिली त्याचादेखील फलक झळकवा, असे भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

डॉ. विखे पाटील फाउंडेशन रुग्णालायच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना ते म्हणाले, दरवाढीच्या बदल्यात मोफत सुविधा पाहाव्यात. केंद्र सरकार ३५ हजार कोटी रुपये खर्च करुन मोफत लसीकरण मोहीम राबवत आहे. हे काम राज्य सरकारचे असून त्यांनी ते केले नाही. त्यामुळे इंधन दरवाढीच्या विरोधात फलक लावताना पंतप्रधानांनी मोफत लस दिली म्हणून त्याचेही फलक लावा असा अजब सल्ला सुजय विखे-पाटील यांनी दिला आहे.

 

Team Global News Marathi: