नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करावी, असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला केले आहे. राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ देखील ट्वीट केला आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांसोबत हिंसाचार आणि मारहाण होत असल्याचे दिसत आहे.

राहुल गांधी यांनी हा व्हिडीओ ट्वीट करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ”अशा हिंसाचाराचा सामना करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि ज्यांनी हा व्हिडीओ पाहिला त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या संवेदना. या प्रकारच्या हिंसाचाराचा सामना करणार्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे त्यांच्या कुटुंबियांसाठी दुःख होत आहे.
https://twitter.com/RahulGandhi/status/1498125685793173509
युक्रेनमध्ये अडकलेल्या विध्यर्थ्यांच्या पालकांनी अशा परिस्थितीतून जाऊ नये. भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्वरित बाहेर काढण्याची योजना शेअर करावी. आपण आपल्या प्रियजनांना सोडू शकत नाही.”, असं राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT