दिल्ली: शारदीय नवरात्री उत्सव (Navratri 2021) 07 ऑक्टोबरपासून (गुरुवारी ) सुरू होणार आणि 15 ऑक्टोबर पर्यंत असेल. यावर्षी दसरा (Dusshera 2021) हा सण शुक्रवार, 15 ऑक्टोबर रोजी राजरा करण्यात येणार आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाला घटस्थापना असेही म्हणतात. घटस्थापनेला या उत्सवात विशेष महत्त्व आहे. घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाते. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, व्रत विधी आणि नियम जाणून घेऊयात..(Ghatasthapana 2021: Ghatasthapana Do it like this on Navratri; Know the Shubh Muhurta and pooja vidhi)
शारदीय नवरात्रीमध्ये घटस्थापनेचा शुभ मुहूर्त (Ghatasthapana Muhurta 2021)
शारदीय नवरात्रीची सुरुवात: 07 ऑक्टोबर, दिवस गुरुवार.
घाट स्थापना किंवा कलश स्थापना: 07 ऑक्टोबर रोजी.
घटस्थापना मुहूर्त: सकाळी 06.17 ते सकाळी 07.07 दरम्यान.घटस्थापना पूजा विधी (Ghatasthapana 2021 Puja Vidhi)
सर्वप्रथम मातीचे भांडे घ्या. त्यात तीन थरांमध्ये माती घाला आणि 9 प्रकारचे धान्य मातीत टाका आणि त्यात थोडे पाणी घाला.
आता एक कलश घ्या. त्यावर स्वस्तिक बनवा. मग मौली किंवा कलावा बांधून ठेवा. यानंतर कलश गंगाजल आणि स्वच्छ पाण्याने भरा.
त्यात एक पूर्ण सुपारी, फुलं आणि दुर्वा घाला. तसेच अत्तर, पंचरत्न आणि नाणे देखील टाका.
कलशाच्या आत आंब्याची पाने लावा. कलशच्या झाकणावर तांदूळ ठेवा.
देवीचे स्मरण करताना कलशाचे झाकण लावा. आता एक नारळ घ्या आणि त्यावर कलवा बांधा. कलशवर स्वस्तिक चिन्ह बनवा.
कुंकवाने नारळावर टिळक लावा आणि नारळ कलशावर ठेवा.
कलशावर नारळासोबत तुम्ही काही फुलेही ठेवू शकता.
दुर्गा देवीच्या स्वागतासाठी हा कलश मंदिरात स्थापन करा.
घटस्थापनेसाठी लागणारे पुजेचे साहित्य:-
शेतातील काळी माती, पत्रावळ, पाच प्रकारचे धान्य (गहू किंवा कडधान्य), विड्याची पानं, हळद-कुंकू, सुपारी, आणि अन्य पूजेचे साहित्य.
महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र ! नवरात्र हे देवीचे व्रत असून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते. या व्रतात नऊ दिवस व्रतस्थ राहून देवीची मनोभावे आराधना केली जाते. (यासंबंधी अधिक माहिती वाचा, श्री दुर्गादेवीची उपासना.) आज अनेक राज्यांत याला उत्सवाचे स्वरूपही आले आहे. या उत्सवात हिंदूंना देवीतत्त्वाचा लाभ होतो; मात्र हल्ली नवरात्रोत्सवाला आलेल्या विकृत स्वरूपामुळे त्यातून देवीतत्त्वाचा लाभ तर दूरच; पण त्याचे पावित्र्यही घटले आहे. या उत्सवातील अनुचित प्रकार रोखून त्याचे पावित्र्य राखणे, हेही काळानुसार धर्मपालनच !
नवरात्र व्रत करण्याची पद्धत
भावार्थ
नवरात्रोत्सवातील अपप्रकार रोखून उत्सवाचे पावित्र्य राखा
महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र ! नवरात्र हे देवीचे व्रत असून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते. या व्रतात नऊ दिवस व्रतस्थ राहून देवीची मनोभावे आराधना केली जाते. (यासंबंधी अधिक माहिती वाचा, श्री दुर्गादेवीची उपासना.) आज अनेक राज्यांत याला उत्सवाचे स्वरूपही आले आहे. या उत्सवात हिंदूंना देवीतत्त्वाचा लाभ होतो; मात्र हल्ली नवरात्रोत्सवाला आलेल्या विकृत स्वरूपामुळे त्यातून देवीतत्त्वाचा लाभ तर दूरच; पण त्याचे पावित्र्यही घटले आहे. या उत्सवातील अनुचित प्रकार रोखून त्याचे पावित्र्य राखणे, हेही काळानुसार धर्मपालनच !
नवरात्र व्रतामागील इतिहास, या व्रताचे महत्त्व आणि ते साजरे करण्यामागील शास्त्र या लेखातून जाणून घेऊया.
तिथी
आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी.
इतिहास
रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदाने रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले.
आ. महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री महिषासुराला ठार मारले. तेव्हापासून तिला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले.
महत्त्व
जगात जेव्हा जेव्हा तामसी, आसुरी आणि क्रूर लोक प्रबळ होऊन सात्त्विक अन् धर्मनिष्ठ सज्जनांना छळतात, तेव्हा देवी धर्मसंस्थापनेकरता पुनःपुन्हा अवतार घेते. त्या देवतेचे हे व्रत आहे.नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी नवरात्रीच्या काळात ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा नामजप अधिकाधिक करावा.
‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा नामजप ऐकण्यासाठी येथे क्लिक करा, ‘श्री दुर्गादेवीचा नामजप’ ! तसेच वाचा, देवीची आरती कशी करावी ?, श्री दुर्गादेवीची आरती, श्री सप्तश्लोकी दुर्गास्तोत्र.
व्रत करण्याची पद्धत
नवरात्र व्रताला पुष्कळ घराण्यांत कुलाचाराचे स्वरूप असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो.
घरात पवित्र स्थानी एक वेदी सिद्ध करून त्यावर सिंहारूढ अष्टभुजादेवीची आणि नवार्णयंत्राची स्थापना करावी. यंत्राशेजारी घट स्थापून त्याची आणि देवीची यथाविधी पूजा करावी.
नवरात्रमहोत्सवात कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे. शेतातील मृत्तिका आणून तिचा दोन पेरे (बोटाची) जाड चौकोनी थर करावा आणि त्यात (पाच किंवा) सप्तधान्ये घालावी. जव, गहू, तीळ, मूग, राळे, सावे आणि चणे ही सप्तधान्ये होत.
महिषासुरमर्दिनीमृत्तिकेचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी, गंध, फुले, दूर्वा, अक्षता, सुपारी, पंचपल्लव, पंचरत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू घालाव्यात.
सप्तधान्ये आणि कलश (वरुण) स्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास पुराणोक्त मंत्र म्हणावेत. तेही येत नसल्यास त्या त्या वस्तूचे नाम घेऊन ‘समर्पयामि’ म्हणून नाममंत्रांचा विनियोग करावा. कलशामध्ये माळ पोहोचेल अशी बांधावी.
नऊ दिवस प्रतिदिन कुमारिकेची पूजा करून तिला भोजन घालावे. सुवासिनी म्हणजे प्रकट शक्ती, तर कुमारिका म्हणजे अप्रकट शक्ती. प्रकट शक्तीचा थोडा अपव्यय होत असल्याने सुवासिनीपेक्षा कुमारिकेत एकूण शक्ती जास्त असते.अखंड दीपप्रज्वलन, त्या देवतेचे माहात्म्यपठन (चंडीपाठ), सप्तशतीपाठ, देवीभागवत, ब्रह्मांडपुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण, ललिता-पूजन, सरस्वतीपूजन, उपवास, जागरण इत्यादी कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्य यांनुसार नवरात्रमहोत्सव साजरा करावा.
देवीपूजनाशी संबंधित अधिक माहितीसाठी पहा, देवीपूजनाशी संबंधित उपासनेच्या काही कृती, देवीची ओटी कशी भरावी ?, देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन कसे करावे ?
पूजकाला उपवास असला, तरी देवतेला नेहमीप्रमाणे अन्नाचा नैवेद्य दाखवावा.
या काळात उत्कृष्ट आचाराचे एक अंग म्हणून श्मश्रू न करणे (दाढीमिशीचे केस आणि डोक्यावरील केस न कापणे), कडक ब्रह्मचर्यपालन, पलंगावर अन् गादीवर न झोपणे, सीमा न उल्लंघणे, पादत्राणे न वापरणे अशा विविध गोष्टींचे पालन केले जाते.
नवरात्राच्या संख्येवर भर देऊन काही जण शेवटच्या दिवशीही नवरात्र ठेवतात; पण शास्त्राप्रमाणे शेवटच्या दिवशी नवरात्र उठणे आवश्यक आहे. त्या दिवशी समाराधना (भोजनप्रसाद) झाल्यावर वेळ उरल्यास त्याच दिवशी सर्व देव काढून अभिषेक आणि षोडशोपचार पूजा करावी. हे शक्य नसल्यास दुसर्या दिवशी सर्व देवांवर पूजाभिषेक करावा.
देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी पेरलेल्या धान्याची झालेली रोपे देवीला वाहतात. त्या रोपांना ‘शाकंभरीदेवी’ म्हणून स्त्रिया डोक्यावर धारण करून विसर्जनाला घेऊन जातात.