“आता कसं वाटतंय गार-गार वाटतंय” अजित पवारांचा भाजपाला टोला

“आता कसं वाटतंय गार-गार वाटतंय” अजित पवरांचा भाजपाला टोला

पुणे विधान भवन येथे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पवारांनी भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडले. शेतकरी आंदोलन, मराठा आरक्षण अशा अनेक मुद्द्यांवर यावेळी अजित पवारांनी भाष्य केले.

भाजपाचे आमदार संपर्कात असल्याचं मी म्हटलेलं नाही. काळजी घ्या तुम्ही मागच्या वेळी फोडाफोडी केली…सरकार येणार नाही, आपली कामं होणार नाहीत यासाठी ते गेले. तिथं कामं होत नसतील ते परत दुसरीकडे जातील एवढंच म्हटले होते.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, तीन चार महिन्यात काही गोष्ट घडू शकतात असं म्हटलं तर त्यांना राग आला. त्यांनी इतर पक्षातील आमदार घेताना उकळ्या फुटत होत्या, बरं वाटत होतं…आता कसं वाटतंय तर गार गार वाटू लागलं आहे, असा उपरोक्त टोला अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांना लगावला होता.

आम्ही अजिबात सतावत नाही. त्यांनी त्यांचे काम करावे आणि आमचे आम्ही करतो. जर यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतले आहेत तर तो रस्त्यावर का आला आहे. इतक्या थंडीत आंदोलन का सुरु आहे याचं आत्मपरीक्षण करावं. इथं बैलगाडीत बसून फोटो काढले. दिल्लीत महाराष्ट्रातूनही शेतकरी गेले आहेत,” असं अजित पवार यांनी सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: