विदेशी गुंतवणूकीत तब्बल चारवेळा अव्वल असलेले राज्य तिसऱ्या क्रमांकावर ही चिंतेची बाब – फडणवीस

विदेशी गुंतवणूकीत तब्बल चारवेळा अव्वल असलेले राज्य तिसऱ्या क्रमांकावर ही चिंतेची बाब – फडणवीस

विदेशी गुंतवणुकीत तब्बल चार वेळा अव्वल असलेले महाराष्ट्र राज्य आता तिसऱ्या क्रमांकावर जाणे ही चिंतेची बाब आहे अशी खणात विरोधी पक्षनेते आणि माजी मुकुमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. तसेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याचा आनंद व स्वागत असल्याचा टोलाही फडणवीसांनी लगावला.

चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र देशात अव्वलस्थानी होता. गुजरात, दिल्ली आणि कर्नाटकमधील गुंतवणूक एकत्र केली तरी, राज्यातील गुंतवणूक त्याहून अधिक होती. देशातील एकूण गुंतवणुकीच्या ४४ टक्के तर, कधी ४२ टक्के गुंतवणूक राज्यात आली.

रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गुजरातमध्ये एक लाख १९ हजार कोटी रुपये गुंतवणुकीमुळे अव्वल स्थान मिळवले. त्यापाठोपाठ कर्नाटकात २७ हजार ४५८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने दुसरे स्थान आहे.

तसेच महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर गेले. करोनाच्या संकटामुळे गुंतवणूकदार चीनमधील गुंतवणूक काढत आहेत. बहुतांश गुंतवणूकदार देशात येण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक येण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचा सल्लाही फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: