पती-पत्नीमधील संवाद कसा असावा ; वाचा सविस्तर-

पती-पत्नीमधील सुंदर संवाद …..

एक दिवस मी माझ्या पत्नीला विचारलं, ” तुला वाईट नाही का वाटत, मी तुझ्याशी उंच आवाजात बोलतो, प्रसंगी रागावून ही देत असतो तरीपण तू पतीभक्तीस कुठेच कमी पडत नाही वा माझ्या अशा वागण्याचा रागही मानून घेत नाही. जेव्हा की माझ्याकडून कधीच पत्नीभक्त बनण्याचा सुध्दा प्रयत्न झाला नाही..??”

मी विधीचा विद्यार्थी आणि माझी ही विज्ञान शाखेची. तरीपण माझ्यापेक्षा हीची आध्यात्मिक शक्ती कैक पटीने जास्त. मी फक्त नियमित वाचन करतो, तीपण करते परंतु सोबतच ती त्याचं पालन सुध्दा करणारी आहे.

माझ्या केलेल्या प्रश्नावर तिने स्मितहास्य केले आणि हातात पाण्याचा ग्लास देत ती म्हणाली, ” मला सांगाल का, एखादा पुत्र मातेची भक्ती करतो तर त्याला मातृभक्त म्हणतात परंतु माता पुत्राची कितीही सेवा करीत असली तरीदेखील तिला पुत्रभक्त असे नाही ना म्हणत…!!”

मी समजून चुकलो, ही आजही मला निरुत्तर करणार….
तरीही मी पुढचा प्रश्न करुन तिला विचारलंच, ” जरा सांगशील का.. जीवनाचा प्रारंभ झाला तेव्हा स्त्री आणि पुरुष दोन्हीपण समसमानचं होते. मग पुरुष कसा श्रेष्ठ ठरला जेव्हा की स्त्री ही शक्तीचे प्रतीक होती.??”

हसतहसत ती म्हणाली, ” तुम्हाला न थोडी विज्ञानाचीही आवड व थोडं वाचन असायला पाहिजे होतं.!”
मी ओशाळलो. तिने सांगावयास सुरुवात केली…
” संसाराची निर्मिती ही दोन वस्तूंपासून निर्मित आहे-
* ऊर्जा आणि
* पदार्थ.

पैकी पुरुष हा ऊर्जेचं तर स्त्री ही पदार्थाचे प्रतीक आहे. पदार्थाला जर विकसित व्हायचं झाल्यास तिला ऊर्जा प्राप्त करावी लागते. ऊर्जेला तशी गरज नसते. ठिक त्याचप्रमाणे जेव्हा एक स्त्री एका पुरुषाला प्राप्त करीत असते तेव्हा ती शक्ती स्वरुप होत येणा-या पिढीकरीता अर्थात तिच्या मुलांकरीता ती प्रथम पूजनीय ठरते कारण ती पदार्थ आणि ऊर्जा या दोघांची स्वामिनी असते. पुरुष त्यात मात्र ऊर्जेचा एक अंश म्हणूनच असतो.”

 

मी तिला न राहवून परत विचारले, ” मग तर तू माझ्यासाठी पूजनीय आहेस कारण तू ऊर्जा आणि पदार्थ या दोहोंची स्वामिनी आहेस..??

 

यावर ती चुटकी घेत म्हणाली, ” आता ना तुम्ही शिकल्या, सवरलेल्या मुर्खासारखे बोलताहेत. तुमच्यातील ऊर्जेचा अंश मी ग्रहण केला आणि शक्तीपूर्ण झाले. मग त्या शक्तीचा प्रयोग मी तुमच्यावर कशी करणार ? ही तर कृतघ्नता ठरेल …!”

 

मी म्हणालो, ” मी तर तुझ्यावर शक्तीचा प्रयोग करतो मग तू का नाही.??”

 

यावर तिचं उत्तर ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, ” तुमच्या संसर्गमात्रानेच माझ्यात जीवन निर्माण करण्याची क्षमता आणि भगवंतापेक्षाही श्रेष्ठ पद मला मिळाले ज्याला ‘आई’ म्हणतात त्यासोबत मला विद्रोह करणे शक्य नाही.”

 

पुढे आणखी चिडवत ती मला म्हणाली, ” जर तुमच्यावर मला शक्ती प्रयोग करावयाचा झाल्यास तरी मला त्याची काय आवश्यकता.? मी तर जानकी.. लव-कुश माझ्या उदरातूनच असतील, जे माझे हिशेब करण्यास तत्पर असणार..!”

 

समस्त ‘स्त्री’मधील वंदनीय ‘मातृशक्ती’ला प्रणाम. जिणे तिच्यातील प्रेम आणि मर्यादेत समस्त सृष्टीला बांधून ठेवलंय.

‘विज्ञान’ आणि ‘अध्यात्म’ यांचे अपूर्व संगम असणारी, सृष्टीच्या रचनेवर आधारित असणारे अद्भुत व्याख्यान मला वाट्सअपवर हिंदी भाषेत निनावी प्राप्त झाले. ते मराठीत अनुवाद करण्याचा हा प्रयत्न. 🙏

– नरेंद्र गायकवाड.

ग्लोबल न्युज नेटवर्क: