राशिभविष्य ; कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी वाचा सविस्तर

आजचे पंचांग – वार शनिवार, दि. 12.02.2022

शुभाशुभ विचार- 16 नंतर चांगला दिवस.

आज विशेष – जया एकादशी.

राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – मृग 06.37 पर्यंत नंतर आर्द्रा.

चंद्र राशी –  मिथुन.

________________________

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- तांबडा)

घरा बाहेर वावरताना रागीट स्वभावावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. एखादा शेरास सव्वाशेर भेटू शकतो. आज वाहन दुरुस्तीचा खर्च उद्भवू शकतो. विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यायला हवी.

वृषभ- ( शुभ रंग – मोतिया)

आज पैशाची कमतरता अजिबात भासणार नाही घराबाहेर तुमच्या वक्तृत्वा व कर्तुत्वाचा ही प्रभाव पडेल. व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.

मिथुन- ( शुभ रंग – क्रीम)

योग्य माणसे संपर्कात येतील. मीपणा  सोडून व गोड बोलून किचकट कामे ही सोपी होतील. कुणालाही सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका. फक्त आपलं कसं भागेल एवढं बघा.

कर्क ( शुभ रंग- पांढरा)

काही कारण नसताना आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज गरजूंच्या कमी याल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहणार आहे. आज गरजेपुरतेच बोला.

सिंह- (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्याही महत्वाकांक्षा वाढतील.

कन्या – (शुभ रंग- हिरवा)

नोकरीच्या ठिकाणी अधिकारांचा वापर जपून करा.अति स्पष्ट बोलण्याने काही हितचिंतकच दुरावण्याची शक्यता आहे. मुलांच्या आरोग्यविषयक तक्रारींची वेळीच दखल घ्या.

तुळ – (शुभ रंग- जांभळा)

व्यवसायात जाहिरातबाजी वाढवावी लागणार आहे. अविश्रांत मेहनती नंतरच यशाची चाहूल लागेल. नवीन व्यावसायिकांनी आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली कराव्यात.

वृश्चिक- (शुभ रंग- आकाशी)

आज चुकीच्या वर्तनाने प्रतिष्ठेची आणि होऊ शकेल वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या चुका काढू नका. विश्वासातील व्यक्तीकडूनही विश्वास घात होऊ शकतो सतर्क राहा.

धनु- (शुभ रंग- चंदेरी)

व्यवसायात भागीदरांशी विश्वास दृढ होईल. वैवाहिक जीवनात जुन्या फोटोंचा अल्बम चाळावसा वाटेल. इतरांच्या भांडणात आज यशस्वी मध्यस्थी कराल.

मकर- ( शुभ रंग- निळा)

नोकरदार मंडळी आज वरिष्ठांच्या आज्ञा झेलतील. ज्येष्ठ मंडळींना आज डॉक्टरांच्या भेटीचे योग अटळ आहेत. व्यवसायात जुनी उधारी वसूल होईल.

कुंभ – ( शुभ रंग- भगवा )

तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. ज्येष्ठांना उत्तम प्रकृतीस्वास्थ्य लाभेल. तरुणाई आज जीवाची मुंबई करतील. प्रेम प्रकरणांना आज ग्रीन सिग्नल.

मीन- ( शुभ रंग- गुलाबी)

आज तुमचे मनोबल उत्तम असेल आवक पुरेशी राहील. तरीही बचतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. काही कौटुंबिक समस्यांवर लक्ष द्यावे लागेल. गृहिणींना गृहोद्योगातून चांगली कमाई होईल.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी

फोन ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तुशास्त्र सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: