राशिभविष्य ; कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी; वाचा सविस्तर-

बुधवार, 9 मार्च रोजी 12 पैकी सात राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. बुधवारी विषकुंभ नावाचा अशुभ योग जुळून येत असल्यामुळे या सात राशीच्या लोकांना धनहानीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस…

मेष : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८
आनंदी व उत्साही असा आज दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्य लाभेल.

वृषभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ४
आज रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी. एखादा बरा झालेला आजार पुन्हा उलटू शकेल.

मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : २
स्वार्थकडे लक्ष असुद्या. दानधर्म करताना स्वत:ची शिल्लक तपासा. मोठे आर्थिक व्यवहार टाळा .

कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६
नवीन लघु उद्योजकांचे कर्जप्रस्ताव मंजूर होतील. पैशाअभावी रखडलेले उपक्रम सुरू करता येतील.

सिंह : शुभ रंग : चंदेरी| अंक : ३
नोकरीत कामाचा ताण प्रचंड वाढला असला तरी तुमची वाटचाल प्रगतीच्याच दिशेने चालू राहील.

कन्या : शुभ रंग : जांभळा| अंक : ७
कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकावीत. हट्टीपणास लगाम घालून इतरांची मते ऐकून घेणे गरजेचे आहे.

तूळ : शुभ रंग : केशरी | अंक : ५
वैवाहिक जिवनांत जोडीदाराच्या चूका काढू नका. आज वाहन काळजीपूर्वक चालवा. आपल्या प्रतिष्ठेस जपा.

वृश्चिक : शुभ रंग : निळा | अंक : ४
हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क केलेत तर यशाची चव लवकर चाखू शकाल. आज दोघात तिसरा नको.

धनु : शुभ रंग : आकाशी| अंक : १
व्यवसायात उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट कराल. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांस यश मिळेल.

मकर : शुभ रंग : गुलाबी| अंक : २
नोकरदार वरीष्ठांचे मूड सांभाळतील. ज्येष्ठांना प्रकृती स्वास्थ लाभेल. तुमची काही गुपिते उघड होतील.

कुंभ : शुभ रंग : मरून| अंक : २
आज अथक परिश्रमांच्या सहाय्याने कार्यक्षेत्रात यशाची कमान चढती राहील. दैव अनुकूल राहील.

मीन : शुभ रंग : राखाडी| अंक : २
नकळत झालेल्या चुकींमुळे आर्थिक नुकसान होऊ शकेल. मातोश्रीं बरोबर काहीतरी मतभेद होतील.

ग्लोबल न्युज नेटवर्क: