राशिभविष्य: कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी : वाचा सविस्तर-

आजचे पंचांग – वार शुक्रवार, दि. 04.03.2022

शुभाशुभ विचार – शुभ दिवस.

आज विशेष – सामान्य दिवस.

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – उत्तराभाद्रपदा.

चंद्र राशी – मीन.

————————————–


आजचे राशीभविष्य –

मेष – (शुभ रंग – मरून)

तरुणांनी मौज मजा करताना कायद्याची चौकट मोडू नये. आवाक्याबाहेर जाणाऱ्या खर्चात कपात गरजेची आहे. काही दूरचे नातलग आज संपर्कात येतील. काहीजणांना तातडीच्या प्रवासास निघावे लागेल.

वृषभ – (शुभ रंग – राखाडी)

आज अत्यंत उत्साही व आनंदी असा दिवस. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. विवाह विषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस अगदी उत्तम.

मिथुन – (शुभ रंग- पांढरा)

नोकरीच्या ठिकाणी स्वतःचे महत्त्व सिद्ध करायचे असेल तर वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत. उच्चशिक्षित मंडळींना विदेश गमनाचे वेध लागतील.

कर्क – ( शुभ रंग -डाळिंबी)

महत्त्वाचे निर्णय घेताना मनाची ओढाताण होणार आहे. अनुभवी व्यक्तींचे सल्ले विचारात घ्या. आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील.

सिंह – ( शुभ रंग- लाल)

कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आज ताकही फुंकून प्यावे असा दिवस. विश्वासातल्या माणसाकडून ही विश्वास घात होऊ शकतो.

कन्या – (शुभ रंग – गुलाबी)

आज व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस दुकानदारांच्या गल्यात वाढ होईल. घाईगर्दीत घेतलेले निर्णय चुकू शकतात. प्रेम प्रकरणांना ग्रीन सिग्नल. खेळाडू अटीतटीची झुंज देतील.

तूळ – ( शुभ रंग – सोनेरी)

नोकरीच्या ठिकाणी हाताखालच्या माणसांशी जुळवून घ्यावे लागेल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी आज दुर्लक्षित करू नका. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या वेळीस झटकून टाकलेल्या बऱ्या.

वृश्चिक – ( शुभ रंग -आकाशी)

मित्रांमध्ये फक्त मोठेपणा घेण्यासाठी काही न परवडणारा खर्च आज तुम्ही कराल. मुलांच्या बाबतीत आज काही योग्य निर्णय घ्यावे लागतील.कलाकार संधींचे सोने करतील.

धनु – (शुभ रंग – भगवा)

प्रॉपर्टी विषयी काही रखडलेली कामे असतील तर त्यांना आज चालना मिळेल. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल. खेळाडूंना सराव वाढवावा लागेल.

मकर – ( शुभ रंग – पिस्ता)

भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ओळखी होतील. कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना मात्र आज सतर्क रहा. आज जागा खरेदी विक्रीचे व्यवहार टाळावेत.

कुंभ – (शुभ रंग- मोरपंखी)

आज विविध मार्गाने लाभ होणार आहेत. व्यवसायात पूर्वी घेतलेले निर्णय अचुक ठरतील. अनेक क्लिष्ट कामे आज सोपी होणार आहेत. काही दुरावलेली नाती जवळ येतील.

मीन – ( शुभरंग- स्ट्रॉबेरी )

आज भावना व कर्तव्य यात मनाची ओढाताण होऊन काही साधे निर्णय घ्यायला ही वेळ लागेल. वैवाहिक जीवनात तर पत्नी जे म्हणेल त्याला हो म्हणून मोकळे होणे हिताचे राहील.

!! शुभम भवतु!!

श्री. जयंत कुलकर्णी
फोन – 9689165424
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: