राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी

गुरुवार 17 फेब्रीवरी रोजी मघा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रहस्थितीमुळे अतिगंड नावाचा एक अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस अडचणींचा राहील. या लोकांनी नोकरी आणि बिझनेसच्या ठिकाणी सावध राहावे. अशुभ योगाच्या प्रभावाने नुकसान होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस…

मेष : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरीही पैशाची कमतरता भासणार नाही.

वृषभ : शुभ रंग : तांबडा| अंक : ३
प्रवासात काही नवे हितसंबंध निर्माण होतील. गृहीणींनी झाकली मुठ झाकलीच ठेवणे हिताचे. कायद्यात रहा.

मिथुन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : १
थोडी मानसिक अस्वस्थता राहील. काही महत्वाची मेल्स येणार आहेत. दुपरानंतर प्रवासास निघाल.

कर्क : शुभ रंग : मोतिया| अंक : ५
तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होणार आहेत. प्रतिष्ठीतांच्या सहवासात रहाल.

सिंह : शुभ रंग : पांढरा| अंक : ४
आपले म्हणणे इतरांना पटवून देता येईल. आज कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल.

कन्या : शुभ रंग : क्रिम| अंक : ६
महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार आहे.आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील.

तूळ : शुभ रंग : निळा| अंक : ८
कार्यक्षेत्रात पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यशाची चाहूल लागेल. आज तुमच्या शब्दास वजन राहील.

वृश्चिक : शुभ रंग : जांभळा| अंक : ७
आज नोकरीधंद्यात अत्यंत उत्साही वातावरण राहील. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल. सुवार्ता येतील.

धनु : शुभ रंग : हिरवा| अंक : ९
दैनंदीन कामातही अडथळे येतील. आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. सत्संगाने मानसिक बळ वाढेल.

मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३
आज तुमच्या मनात काही नकारात्मक विचार येतील. महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या.

कुंभ : शुभ रंग : राखाडी | अंक : २
कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना तुमाचा कार्यउत्साह वाढवतील. आज मुले अज्ञा पाळतील.

मीन : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. पत्नीचे मूड सांभाळावे लागतील.

ग्लोबल न्युज नेटवर्क: