राशिभविष्य: वाचा कसा असेल आजचा रविवार तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज ​- आजचे पंचांग. वार – रविवार 28 मार्च 2021

शुभाशुभ विचार — वर्ज्य दिवस.
आज विशेष – हुताशनी पौर्णिमा. ( होळी)
राहू काळ – संध्याकाळी 4.30 ते 6.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – उत्तरा 17.36 पर्यंत नंतर हस्त.
नक्षत्र पाया— चांदी
चंद्र राशी – कन्या.

आजचे राशीभविष्य

 

मेष – ( शुभ रंग – लाल)

कार्यक्षेत्रात विरोधकांच्या कारवाया वाढलेल्या आहेत. एखादा शत्रू मित्रांमध्येच लपलेला असू शकतो सावध राहा. नवीन ओळखीत आर्थिक व्यवहार नकोत.

वृषभ – ( शुभ रंग – क्रीम )

काही दुरावलेल्या हित संबंधात सुधारणा होईल. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. आज मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतिनेही तुम्ही भारावून जाल.

मिथुन – ( शुभ रंग- पिस्ता )

व्यवसायात पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळेल. विरोधकांचा विरोध मावळेल कार्यक्षेत्रात योग्य हितसंबंध निर्माण होतील. ध्येय साध्य करता येतील.

कर्क – ( शुभ रंग मरून)

आज काही कौटुंबिक कर्तव्य पार पाडण्यासाठी तुम्हाला वेळ काढावाच लागेल. जमाखर्चाचा मेळ घालणे जरासे अवघड जाईल. आज तुमचा जास्त वेळ घराबाहेर जाईल.

सिंह –( शुभ रंग – सोनेरी)

आज काही मनाजोगत्या घटना घडल्याने तुमचा कार्य उत्साह वाढेल महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही अग्रेसर राहाल. आपले म्हणणे विरोधकांना पटवून देऊ शकाल.

 

कन्या – ( शुभ रंग- हिरवा )

आज तुम्ही स्वतःचेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्याकडून घाईगर्दीत काही चुकीचे निर्णय घेतले जातील, स्वतःवर थोडा संयम ठेवा. इतरांचेही ऐकून घ्यायची तयारी ठेवा.

तूळ – ( शुभ रंग डाळिंबी )

आज कार्यक्षेत्रात काही पेच प्रसंगांना यशस्वीरीत्या सामोरे जाल. भक्तीमार्गात असणाऱ्यांना उपासनेचे फळ मिळेल. दूरचे प्रवास कार्यसाधक ठरणार आहेत.

वृश्चिक – ( शुभ रंग- राखाडी)

व्यवसायात उत्तम यश मिळून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करू शकाल. प्रिय मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आजची संध्याकाळ मजेत जाईल.

धनु –( शुभ रंग – निळा )

आज भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य द्याल. सहकारी मंडळी तुमच्या मताचा आदर करतील. योग्यवेळी अधिकारांचा वापर कराल. इच्छित ध्येय साध्य होतील

मकर – ( शुभ रंग – मोरपंखी )

आज ऐकावे जनाचे करावे मनाचे हेच धोरण हिताचे राहील. आज मोफत सल्लागार मंडळी बरीच भेटतील. नोकरीत वरिष्ठांनी दिलेली आश्वासने फार मनावर घेऊ नका.

कुंभ – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

नवीन व्यावसायिकांनी आर्थिक गुंतवणूक करताना आपली कुवत ओळखावी. कर्ज प्रस्ताव रखडणार आहेत. कार्यक्षेत्रात अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल.

मीन – (शुभ रंग गुलाबी )

योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन यांच्या जोरावर प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. योग्य माणसे संपर्कात येतील. वैवाहिक जीवनात आज फक्त आय लव यू म्हटल्याने बरेचसे प्रश्न सुटतील.
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

ग्लोबल न्युज नेटवर्क: