राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी

आजचे पंचांग – वार बुधवारदि. 06.04.2022

शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.

आज विशेष — सामान्य दिवस.

राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र — रोहिणी 19.40 पर्यंत नंतर मृग.

चंद्र राशी –  वृषभ.

________________________

आजचे राशीभविष्य

मेष -( शुभ रंग- पांढरा)

आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आज तुम्हाला आपल्या आवडत्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळू शकेल. वक्ते व्यासपीठ गाजवतील.

वृषभ- ( शुभ रंग- आकाशी)

आज तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणे हिताचे राहील. वादविवादात फक्त ऐकण्याचे काम करा, मोफत सल्ले वाटप नको.

मिथुन-( शुभ रंग- मोरपंखी)

काही कौटुंबिक वाद असतील तर ते सुसंवादाने मिळू शकतील. तुम्ही घरचे सोडून लष्कराच्या भाकर्‍या भाजाल. जमाखर्चाचा मेळ घालणे आज जरासे अवघड जाईल.

कर्क – (शुभ रंग- पिस्ता)

व्यवसायात आर्थिक उलाढाल वाढेल. कार्यक्षेत्रात नवी आव्हाने स्वीकाराल. स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. वैवाहिक जीवन सौख्य पूर्ण राहील.

सिंह – ( शुभारंभ- डाळिंबी)

वादविवादात आज तुम्ही स्वतःचेच घोडे पुढे दामटवाल. हाताखालच्या मंडळींना तुमचे दडपण जाणवेल. आज आर्थिक व्यवहारात मात्र सावध राहणे गरजेचे आहे.

कन्या- (शुभ रंग- सोनेरी)

क्षुल्लक कामातही अडचणींचा सामना करावा लागेल. कार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेमुळे थोडेफार नैराश्य जाणवेल. विद्यार्थी आज अभ्यासात चालढकल करणार आहेत.

तूळ (शुभ रंग – चंदेरी)

आज तुम्ही जे काही कराल ते तब्येतीला जपूनच करा. विवाह जुळवण्याविषयी चर्चा आज नकोतच. अंगमेहनतीची कामं करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षिततेस प्रथम प्राधान्य द्यावे

वृश्चिक – (शुभ रंग -केशरी)

आज तुम्ही व्यवसायातील वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. अडचणीच्या प्रसंगी पत्नीची साथ मोलाची राहील. पारिवारिक सदस्यांमध्ये सलोखा राहील.

धनु – (शुभ रंग- सोनेरी)

उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळच आहे. ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. काही येणी असतील तर न मागता वसूल होतील. पत्नीचे मूड जपावे लागतील.

मकर- (शुभ – रंभ क्रीम)

घरात आधुनिक सुखसोयी साठी खर्च कराल. कार्यक्षेत्रात तुम्हाला पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. कलाकारांची लोकप्रियता वाढेल. आनंदी दिवस.

कुंभ – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस. इतरांना दिलेले शब्द पळता येतील.

मीन – ( शुभ रंग- मरून)

दैनंदिन कामात काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. महत्त्वाचे व्यावसायिक करार यशस्वी होतील. मुलांना अभ्यास सोडून सर्व काही सुचेल. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल. प्रवास सुखाचे होतील

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.

फोन ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: